• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'म्हातारं होणं हा गुन्हा आहे का?' वय झाल्यानंतर बॉलिवूड दखल घेत नाही; शरत सक्सेना यांची खंत

'म्हातारं होणं हा गुन्हा आहे का?' वय झाल्यानंतर बॉलिवूड दखल घेत नाही; शरत सक्सेना यांची खंत

कलाकारांच वय झाल्यानंतर बॉलिवूड जास्त काम देत नसल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांनी व्यक्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई 30 जून : बॉलीवूडमध्ये (Bollywood) आजवर अनेक कलाकार आले नी गेले देखील. खूप कमी अभिनेते किंवा अभिनेत्री असतात ज्यांची दखल अधिक काळ घेतली जाते. अन्यथा उगवत्या सूर्याला नमस्कार असंच चक्र सुरू असतं. रोज नव्याने असंख्य कलाकार या सिने जगतात नाव कमावण्यासाठी येतात. पण अनेक वर्षे काम करूनही वय झाल्यानंतर काम मिळत नाही अशी खंत अनेक कलाकारांनी बोलूनही दाखवली आहे. त्यातच आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना (Sharat Saxena) यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचं मन मोकळं करत खंत ही व्यक्त केली आहे. त्यांनी बॉलिवूड एकदा वय झालं की कशी वागणूक देत यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “अभिनेता हे काम तितकं सोपं नाही. इंडस्ट्री तुमच्याकडून सतत तरुण दिसण्याची मागणी करत असते. तेही वर्षाचे 365 दिवस. आणि हे सगळं मिळवण्यासाठी कलाकारांना रोज खूप मेहनत घ्यावी लागते. रोज अवघड  वर्क आऊट करावे लागतात तसेच आज पेक्षा उद्या आणखी फिट आणि तरुण दिसण्याचा तणाव सहन करावा लागतो.”

  चक्क विवियन रिचर्डला आशा भोसले म्हणाल्या होत्या 'नाना पाटेकर'; अशी होती नीना गुप्ता यांची रिअॅक्शन

  पुढे बोलताना ते म्हणाले, “मी 71 व्या वर्षी हे सगळं करतो रोज नियमित व्यायाम करतो. तसेच 45 वयातील दिसण्याचा प्रयत्न ही करतो. कारण जर जास्त वय दिसू लागलं तर इंडस्ट्री त्यांना बाहेर फेकून देईन.”

  पुढे त्यांनी सांगितलं की, बॉलिवूड ही तरुण लोकांची इंडस्ट्री आहे. प्रत्येकाने तरुण असायला हवं. एखाद्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं वय झालं तरी त्यांना इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी तरुण दिसण महत्त्वाचं असतं. पुढे ते म्हणाले की, “म्हातारं होणं हा काही गुन्हा आहे का?” शरत यांनी आजवर 300 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. त्यात हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांनाही समावेश आहे. मागील काही वर्षात ते ‘बजरंगी भाईजान’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘रेस 3’, ‘दबंग 3’ या चित्रपटांतही दिसले होते. लवकरच ते तडप या चित्रपटात झळकणार आहेत.
  Published by:News Digital
  First published: