मुंबई, 11 जून : टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते मंगल ढिल्लन यांचं निधन झालं आहे. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण आता त्यांची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली असून अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. जवळच्या मित्रांच्या माहितीनुसार, हा अभिनेता मागच्या एका महिन्यापासून लुधियाना येथील कर्करोग रुग्णालयात दाखल होता, जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. रिपोर्ट्सनुसार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता यशपाल शर्मा याने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्याने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मंगल ढिल्लन यांचं निधन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे येत्या 18 जून रोजी मंगल यांच्या वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाच्या आठवडाभर आधी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. मंगलने रेखाच्या 1988 मध्ये आलेल्या ‘खूब भरी मांग’ चित्रपटात कॅमिओ केला होता. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटातून मंगल घराघरात पोहचले होते.
मंगल ढिल्लन पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. एवढेच नाही तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. ते पंजाबमधील फरीदकोटचा रहिवासी होता. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावात शीख कुटुंबात झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण पंज ग्रामीण कलान सरकारी शाळेत झाले. यानंतर तो वडिलांसोबत उत्तर प्रदेशला गेला. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते पंजाबला परतले. पदवीनंतर, त्यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केले आणि 1979 मध्ये पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे भारतीय नाट्य विभागात प्रवेश घेतला आणि 1980 मध्ये अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण केला. Kangana Ranaut : ‘ड्रग्ज घेणाऱ्याने रामाची भूमिका….’ . कंगनाचा रणबीर कपूरवर जोरदार निशाणा मंगल ढिल्लनला पहिला ब्रेक 1986 मध्ये मिळाला आणि त्यांनी कथा सागर या टीव्ही मालिकेत काम केले. पण या वर्षी आलेल्या बुनियाद या लोकप्रिय मालिकेतून त्याला ओळख मिळाली. यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूरजहान यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. टीव्हीमध्ये काम करत असतानाच त्याला चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. तो पहिल्यांदा 1988 मध्ये आलेल्या खून भरी मांग या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याने वकिलाची भूमिका साकारली होती. याशिवाय घायल महिला, दयावान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. तो शेवटचा 2017 मध्ये आलेल्या तुफान सिंग या चित्रपटात दिसला होता. त्यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय.