जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / २४ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्रीचा तो थरार; 'वेडात मराठे...' मध्ये पाहायला मिळणार 7 शूरवीरांची 'ती' शौर्यगाथा

२४ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्रीचा तो थरार; 'वेडात मराठे...' मध्ये पाहायला मिळणार 7 शूरवीरांची 'ती' शौर्यगाथा

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची काल भव्य घोषणा करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या त्या सात वीरांची पहिली झलक पाहायला मिळणाली. पण सिनेमात नेमकी कोणाची कथा पाहायला मिळणार आहे, जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 नोव्हेंबर : महेश मांजरेकर दिग्दर्शिक वेडात मराठे वीर दौडले सात या नव्या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली.  अभिनेता प्रवीण तरडे यांच्यासह हार्दिक जोशी, विशाल निकम , विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे  हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. या कलाकारांसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा करण्यात आली.   स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती त्या सात शूरवीरांची गाथा सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. 24 फेब्रुवारी 1674च्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं. ती रात्र ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रतापराव गुजर आणि त्यांच्या 6 शूर शिलेदारांच्या अद्वितीय पराक्रमाची महती सांगणारी ध्वनिचित्रफीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आली. त्यानंतर सातही योद्धयांची अतिशय बहारदार सादरीकरणातून रंगमंचावर एंट्री झाली.  उपस्थितांच्या टाळयांच्या कडकडाटातच मा. मुख्यमंत्र्यांनी मुहूर्ताचा नारळ वाढविला आणि राजसाहेबांनी क्लॅप देऊन संपूर्ण टीमला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता सलमान खाननेही याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होता. हेही वाचा - Bigg Boss मधील ‘हे’ त्रिकूट एकत्र; ‘वेडात मराठे…’ सिनेमातील पहिला लुक आला समोर

 मंगळवार २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापराव गुजरांसह सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बहलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. वेळीच त्याचा ‘बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका’ अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. प्रतापराव गुर्जर आपल्या सहा शिलेदारांसह शेकडोच्या सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बहलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. त्या रात्रीचा तो थरार वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संकलन मनीष मोरे तर छायांकन अभिमन्यू डांगे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे असणार आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत हितेश मोडक यांचे आहे. साहस दृश्ये प्रद्युमन कुमार स्वान यांची आहेत. उमेश शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा थरार रुपेरी पडद्यावर पहाण्यासाठी आपल्याला २०२३च्या दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात