मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ved teaser out : '... आणि मला वेड लागलं'; आपल्या मराठमोळ्या दोस्तासाठी अक्षयचं थेट मराठीत ट्विट

Ved teaser out : '... आणि मला वेड लागलं'; आपल्या मराठमोळ्या दोस्तासाठी अक्षयचं थेट मराठीत ट्विट

 'वेड' टिझर रिलीज

'वेड' टिझर रिलीज

रितेश देशमुख आणि जेनेलियाचा नवा चित्रपट 'वेड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता आज 'वेड' चा टिझर रिलीज झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 24 नोव्हेंबर:   मराठमोळ्या रितेश देशमुखने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पण आता हा अभिनेता दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल  ठेवायला सज्ज झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या चित्रपटाचा टिझर नुकतंच रिलीज झाला आहे. रितेशची पत्नी आणि  अभिनेत्री जेनेलियानं 2003 मधे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. दोघांनी बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. अशातच दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'वेड' चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. यात दोघेही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रितेश देशमुखने त्याचा आगामी चित्रपट 'वेड' च्या पोस्टरचे अनावरण केले होते. आज त्याच्या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. आता या मराठमोळ्या अभिनेत्याचे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मराठमोळ्या शब्दात कौतुक केले आहे. अक्षयने रितेशसाठी ट्विट करत लिहिलंय कि, ''माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शीत केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं. तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !''अशा शब्दात अक्षय कुमारने रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा - Akshay kumar- Ritesh Deshmukh: अक्षय-रितेशची जोडी पुन्हा झळकणार एकत्र; 'या' चित्रपटात घालणार धुमाकूळ

अक्षय कुमारने रितेशसाठी खास मराठीतून केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेश आणि अक्षय चित्रपटसृष्टीतील चांगले मित्र आहे. या  ‘हाऊसफुल’ या चित्रपटात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आलेले या चित्रपटाचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले.आता अक्षय आणि रितेश लवकरच हाऊसफुल सिरीजच्या  पुढच्या भागात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता अक्षयने आपल्या या मराठी दोस्ताचं  केलेलं कौतुक चाहत्यांना खूपच भावलं आहे.

'वेड' चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं असून तो आणि जेनेलिया मुख्य भुमिकेत झळणार आहे. वेड चित्रपटातून अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. खूप काळानंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आता दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

दरम्यान, रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच सलमान खानही पहायला मिळणार आहे. त्यामुळे तर चाहते या चित्रपटाची आणखीनच आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेम कहाणी आणि थ्रिलर या आशयाचा चित्रपट असेल, असा अंदाज टीझरवरून लावला जात आहे. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood actor, Marathi cinema, Ritesh deshmukh