मुंबई, 18 जून- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या आपल्या आगामी ‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी,अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनीष पॉल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका अवॉर्ड शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये वरुण गुजरातचे आयपीएस अजय चौधरी आणि अहमदाबाद पोलिसांचे आभार व्यक्त करताना दिसत आहे. कौटुंबिक हिंसाचार पीडितेला मदत केल्याबद्दल त्यांनी पोलिस आणि आयपीएसचे आभार मानले.पाहूया काय आहे प्रकरण.. ‘जुग जुग जिओ’च्या प्रमोशनदरम्यान, घरगुती हिंसाचाराने पीडित असलेल्या एका महिला चाहतीने वरुणकडे मदत मागितली होती. वरुणने या महिलेच्या प्रकरणाबाबत गुजरात पोलिसांना टॅग करत ट्विट केलं होतं. आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली होती. या अवॉर्ड शोमध्ये वरुणने या घटनेबाबत मीडियाशी संवाद साधला. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्याने माध्यमांना मनमोकळेपणाने उत्तरसुद्धा दिले.सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना वरुण धवनने सांगितले की, ट्विटरवर सुमारे 10 अकाऊंट्सद्वारे याबद्दल विचारण्यात आलं होतं.त्यांनतर वरुणने एका पत्रकारासह प्रकरणाची पडताळणी केली आणि त्यानंतर अहमदाबादमधील त्याचे मित्रही होते ज्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले. आणि याची पडताळणी केली की ती महिला खरोखरच घरगुती हिंसाचाराची बळी आहे आणि त्यानंतर हे प्रकरण कायदेशीररित्या हाताळण्यात आलं आहे. **(हे वाचा:** काश्मिरी पंडितांबाबत वक्तव्य करुन वादात अडकलेल्या साई पल्लवीला चित्रपट नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं काम ) वरुण धवनने अहमदाबाद पोलीस आणि आयपीएस अजय चौधरीचे त्यांनी तत्पर कारवाई करून प्रकरण स्वतःच्या हातात घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. आपल्याला खूप आनंद झाल्याचं सांगत त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. वरुण सध्या आपल्या टीमसोबत आपल्या आगामी ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.