काश्मिरी पंडितांबाबत वक्तव्य करुन वादात अडकलेल्या साई पल्लवीला चित्रपट नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचं होतं काम
Sai Pallavi: साऊथ सुपरस्टार (South Actress) साई पल्लवी सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'काश्मिरी पंडितांचं पलायन' आणि 'गौरक्षण' बाबत अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिच्यावर टीका केली जात आहे. तर काही लोक तिच्या बेधडकपणाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
|
1/ 6
साऊथ सुपरस्टार (South Actress) साई पल्लवी सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'काश्मिरी पंडितांचं पलायन' आणि 'गौरक्षण' बाबत अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिच्यावर टीका केली जात आहे. तर काही लोक तिच्या बेधडकपणाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
2/ 6
साई पल्लवी हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने फारच कमी कालावधीत साऊथ सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. या अभिनेत्रीचं पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय असून ती सध्या ३० वर्षांची आहे.
3/ 6
साई पल्लवी फक्त एक उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक डान्सरसुद्धा आहे.ही अभिनेत्री प्रामुख्याने तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते.
4/ 6
साई पल्लवीने मल्याळम चित्रपट प्रेमम (2015) आणि तेलुगू चित्रपट फिदा (2017) मधील अभिनयासाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत. याशिवाय तिला इतरही अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
5/ 6
फारच कमी लोकांना माहिती आहे की साई पल्लवीने डॉक्टरची पदवी घेतली आहे. 2016 मध्ये जॉर्जियाच्या तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीबीएस डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
6/ 6
नुकतंच 17 जून रोजी अभिनेत्रीचा 'विराट पर्वम' हा चित्रपट रिलीज झाला आहे ज्यामध्ये ती राणा डग्गुबातीसोबत दिसत आहे. यानंतर ती 'गार्गी'मध्ये दिसणार आहे, ज्याचं शूटिंग सध्या सुरू आहे.