जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Chala Hawa Yeu Dya: वरुण धवनने हवा येऊ द्या च्या मंचावर घातला धिंगाणा, पाहा खास video

Chala Hawa Yeu Dya: वरुण धवनने हवा येऊ द्या च्या मंचावर घातला धिंगाणा, पाहा खास video

Chala Hawa Yeu Dya: वरुण धवनने हवा येऊ द्या च्या मंचावर घातला धिंगाणा, पाहा खास video

चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बॉलिवूड स्टारची एंट्री होणं आता नेहमीचंच झालं आहे. मात्र यावेळी आलेल्या बॉलिवूड स्टारने खतरनाक काहीतरी केल्याचं समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जून: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya)  या झी मराठीवरील धमाल कॉमेडी शो मध्ये नुकतीच ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची टीम हजेरी लावून गेली. झकास ऍक्टर अनिल कपूर, वरुण धवन, किआरा अडवानी अशा कलाकारांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात अक्षरशः डोळ्यात पाणी येईपर्यंत कलाकार हसत असल्याचे अनेक विडिओ सुद्धा प्रसिद्ध झाले होते. आता याच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. या कार्यक्रमात वरुण धवनने (Varun Dhawan) धमाल उडवून दिल्याचं सांगितलं जात आहे. झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक विडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आला आहे ज्यातून हे स्पष्ट होत आहे की वरुणने कार्यक्रमात किती कल्ला केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुण आणि किआराचा मुखवटा घातलेला हवा येऊ द्या च्या टीममधील एक कलाकार एकत्र नाचताना दिसत आहेत. त्यांच्या सुपरहिट ‘नाच पंजाबन’ या गाण्यावर वरुण आणि मुखवटा परिधान केलेल्या अभिनेत्याने पिंगा घालत मज्जा आणली आहे. सुरवातीला स्किटमध्ये कुशल सुद्धा या खोट्या आणि funny किआरासोबत नाचताना दिसत आहे. नंतर मुखवटा काढून खऱ्या मुलीचा चेहरा बघून तो घाबरतो आणि सगळी टीम खो-खो हसते असं सुद्धा त्यांनी दाखवलं आहे.

जाहिरात

चला हवा येऊ द्या ची टीम नेहमीच काहीतरी भन्नाट कल्पना घेऊन स्किट करत असते. यावेळी त्यांनी खोटी किआरा आणली आहे तर कुशल बद्रिके हा अनिल कपूर यांच्या वेशात आहे असं व्हिडिओमध्ये बघून वाटत आहे.

त्यांच्यासोबत फिल्मच्या टीमने सुद्धा खूप धमाल केल्याचं कळत आहे. सगळेच स्किट एन्जॉय करताना दिसत आहेत. अक्षरशः डोळ्यात पाणी येईस्तोवर हसताना किआरा अडवानी आणि अनिल कपूर दिसत आहेत. हे ही वाचा- Swapnil Joshi news: मायरा आणि राघवने ‘बाबी’ला दिलं ‘बाप’ सरप्राईज! बॉलिवूडचा धमाल फॅमिली एंटरटेनमेंट असणारा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट येत्या 24 जून रोजी रिलीज होणार आहे. एका चौकोनी कुटुंबाची अतरंगी गोष्ट असणारा हा चित्रपट कॉमेडी, ड्रामा आणि इमोशनने परिपूर्ण चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची टीम नुकतीच हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात हजेरी लावून गेली. (Anil Kapoor) अनिल कपूर, वरूण धवन, (Kiara Advani) किआरा अडवानी या सुपरहिट बॉलिवूड कलाकारांनी या शो मध्ये हजेरी लावली आणि आपल्या फिल्मचं प्रमोशनसुद्धा केलं. या कार्यक्रमाच्या सेटवरून खुद्द वरुण धवनने खळखळून हसतानाच्या काही इंस्टाग्राम स्टोरी सुद्धा शेअर केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात