मुंबई 19 जून: फादर्स डे हा प्रत्येक वडिलांसाठी खास असतो. बाबांचं आपल्या मुलांशी असलेलं नातं साजरं करणारा हा दिवस कलाकारांच्या आयुष्यात सुद्धा आनंदच घेऊन येताना दिसत आहे. असाच आनंद सध्या स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) या कलाकाराच्या आयुष्यात आला आहे. कारण फादर्स डे साठी त्याला एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. आणि हे सरप्राईज देणारे सुद्धा त्याची चिमुरडी मुलंच आहेत.
यासंबंधीचा एक विडिओ स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Swapnil Joshi Instagram) शेअर केला आहे. याला कॅप्शन देत तो असं म्हणतो, “बाबा आहेच, पण तुमच्यामुळे "बाप" feeling आलं ! Thank u team @zeemarathiofficial for this wonderful” स्वप्नील बराच काळ सध्या सेटवर घालवत असल्याने त्याची आणि कुटुंबाची वेळ जुळणं अवघड झालं आहे. त्याला मुलांसोबतसुद्धा हवा तास वेळ घालवता येत नाहीये. त्यामुळे त्याच्या मुलांनीच त्याला एक धमाल सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि ते थेट त्याच्या सेटवरच जाऊन पोहोचले. स्वप्नील सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेचं चित्रीकरण करत आहे. त्यामुळे स्वप्नीलची सगळी फॅमिली विशेषतः त्याची चिमुकली मुलं राघव आणि मायरा यांनी सेटवर येऊन स्वप्नीलला सरप्राईज दिलं. स्वप्नीलला अजिबातच अपेक्षा नसताना त्याला हे सरप्राईज मिळाल्याने तो सुद्धा भरवून गेल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.
यात सगळ्या टीमचा सुद्धा सहभाग असल्याचं समजतं. झी मराठी कुटुंबाकडून त्याला मिळालेल्या सर्प्राइजसाठी त्याने वाहिनीचे आभरसुद्धा मानले आहेत. नंतर त्यांनी ‘फादर्स डे’ स्पशेषल केक सुद्धा कापला आणि सगळ्या टीमने केकचा आस्वाद घेतल्याचं पाहायला मिळतं.
याबद्दल स्वप्नीलची बायको असं सांगते, “मला हे सरप्राईज द्यायला खूप धमाल आली. अगदी प्लॅनिंग पासून ते खरंखुरं सरप्राईज देईपर्यंत कोणालाही न कळू देणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. स्वप्नीलपासून काहीही लपवणं फारच अवघड आहे. त्यामुळे जमेल का शंका होती. आणि मुलांना सुद्धा आज सकाळपर्यँत काही खबर लागू दिली नव्हती नाहीतर त्यांनी सांगून टाकलं असतं आणि सर्प्राईजचा बट्याबोळ झाला असता. व एकूणच हे सरप्राईज द्यायला मज्जा आली.”
हे ही वाचा-Prasad Oak: '...बाप कुणाला कळतो गं'; प्रसाद ओकसाठी पत्नी मंजिरीने लिहली खास पोस्ट
स्वप्नीलचे वडील, स्वप्नील आणि त्याची दोन मुलं मायरा आणि राघव अशा तिन्ही पिढ्या आज सेटवर हजर आहेत हे पाहून अनेकांना खूप कौतुक वाटलं. स्वप्नीलने आवर्जून वडिलांना सेटवर फिरवलं, प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती दिली. स्वप्नील सुद्धा आपली प्रतिक्रिया देत म्हणाला, “अनेक दिवस हा योग येण्यासाठी थांबलो होतो. त्यांना मी अनेकदा सेटवर या म्हणून बोलवलं पण मनासारखी वेळ जुळत नव्हती. कदाचित या दिवशी योग जुळून यायचं लिहिलं होतं.” असं म्हणून त्याने बायको लीना, झी मराठी वाहिनी आणि मालिकेच्या टीमचे आभार मानले.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.