जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Varun Dhawan: शाहरुख नंतर आता वरुणचं उजळलं नशीब; साऊथच्या बड्या दिग्दर्शकाच्या सिनेमात अभिनेत्याची वर्णी

Varun Dhawan: शाहरुख नंतर आता वरुणचं उजळलं नशीब; साऊथच्या बड्या दिग्दर्शकाच्या सिनेमात अभिनेत्याची वर्णी

 वरुण धवन

वरुण धवन

वरुणला एका चांगल्या हिट चित्रपटाची अपेक्षा आहे. यातच आता त्याच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. साऊथच्या एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात वरुण धवन झळकणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी तो भेडिया या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या चित्रपटातील वरुणच्या अभिनयाचं कौतुक  झालं. आता यानंतर वरुणला एका चांगल्या हिट चित्रपटाची अपेक्षा आहे. यातच आता त्याच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. साऊथच्या एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात वरुण धवन झळकणार आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अटली सध्या शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात शाहरुख खान  सोबतच नयनतारा आणि विजय सेतुपतीसारखे स्टार्स दिसणार आहेत. दरम्यान, अटलीच्या पुढील चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तो एक अॅक्शन चित्रपट बनवणार असून त्यात वरुण धवनची वर्णी लागली आहे. याआधी कधीही न अनुभवलेले अॅक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळतील असा दावाही केला जात आहे. ‘जवान’ रिलीज झाल्यानंतर अटली वरुणसोबत या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. अशातच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वरुण धवनने इन्स्टाग्राम स्टोरीवर तारीख जाहीर केली आहे. अभिनेत्याने लिहिले, ‘31 मे 2024 रोजी VD18 थिएटरमध्ये.’ पण , अटली केवळ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती आहे. याचे दिग्दर्शन कॅलेस करणार असून यात अनुष्का शर्मा देखील दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्काची भूमिका असल्याच्या अफवा खऱ्या ठरल्या तर अनुष्का आणि वरुण ‘सुई धागा’ नंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याची ही दुसरी वेळ असेल. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. Shiv Thakare: ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर शिव ठाकरे जखमी; स्टंट करताना अशी झाली दुखापत रिलीजच्या तारखेशिवाय या चित्रपटाविषयी इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटात वरुणची भूमिका नेमकी कशी असेल, अजून कोणती स्टारकास्ट असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.

News18

वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर, अटली सध्या शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती चा ‘जवान’ या चित्रपटाच्या रिलीजच्या तयारीत आहे.  दरम्यान, वरुण धवन ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ‘सिटाडेल’मध्ये तो साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. याशिवाय नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ या चित्रपटात तो जान्हवी कपूरसोबत झळकणार आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरवर त्याचा प्रीमियर होणार आहे. तो शेवटचा ‘भेडिया’ चित्रपटात क्रिती सेनन, अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियालसोबत दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात