Instagram फॉलोअर्स कमी असल्यामुळं झाली बेरोजगार; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Instagram फॉलोअर्स कमी असल्यामुळं झाली बेरोजगार; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सोशल मीडियावर तुम्हाला कोणी ओळखत नसेल तर चित्रपटांमध्ये तुम्हाला काम मिळेल याची शाश्वती नाही. असा खळबळजनक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री वंदना सजनानी (Vandana Sajnani) हिनं केला.

  • Share this:

मुंबई 28 फेब्रुवारी : सिनेसृष्टीत काम करण्यासाठी अभिनय करता येणं हे अत्यंत महत्वाचं असतं, असं म्हटलं जातं. परंतु वास्तवात अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतंय. जर सोशल मीडियावर तुम्हाला कोणी ओळखत नसेल तर चित्रपटांमध्ये तुम्हाला काम मिळेल याची शाश्वती नाही. असा खळबळजनक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री वंदना सजनानी (Vandana Sajnani) हिनं केला. इन्स्टाग्रामवर (Instagram) सक्रिय नसल्यामुळं या अभिनेत्रीला निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिला असा चकित करणारा दावा या अभिनेत्रीनं केला आहे. (less social media followers)

वंदना ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर तिनं प्रचंड काम केलं आहे. नुकतीच आज तकला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं सिनेसृष्टीतील या बदललेल्या ट्रेंडबाबत खुलासा केला. ती म्हणाली,

“अनेक नवे कलाकार ऑडिशनसाठी तयारी करताना आपल्या अभिनयावर जास्त लक्ष केंद्रीत करतात. परंतु त्यांनी अभिनयासोबतच सोशल मीडिया हँडलवरदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. एक काळ होता जेव्हा चित्रपटात काम केल्यावर लोक प्रसिद्ध व्हायचे अन् आता प्रसिद्ध लोकांनाच चित्रपटात काम मिळतं. अलिकडेच मी देखील सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण सोशल मीडियावर मला फारसं कोणी ओळखत नाही. माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत. त्यांना माझ्या अभिनयात रस नव्हता तर माझ्या मार्फत चित्रपटाची प्रसिद्धी होईल की नाही? याकडे त्यांचं लक्ष होतं.”

‘त्या’ मारहाणीनंतर अभिनेत्रीनं शेअर केला आणखी एक व्हिडीओ; मुंबई पोलिसांना म्हणाली...

वंदना ही प्रसिद्ध अभिनेता राजेश खट्टर याची पत्नी आहे. 2003 साली मै माधुरी दिक्षित बनना चाहती हूं या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दिल धडकने दो, कर्तव्य, क्या कसूर है यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. तिच्या चित्रपटांना समिक्षकांनी दाद दिली परंतु तिकिटबारीवर मात्र हाऊसफुलचा बोर्ड लागला नाही. हिंदी रंगभूमीवर तिनं प्रचंड काम केलं आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 28, 2021, 11:45 AM IST

ताज्या बातम्या