Home /News /entertainment /

‘त्या’ मारहाणीनंतर अभिनेत्रीनं शेअर केला आणखी एक व्हिडीओ; मुंबई पोलिसांना म्हणाली...

‘त्या’ मारहाणीनंतर अभिनेत्रीनं शेअर केला आणखी एक व्हिडीओ; मुंबई पोलिसांना म्हणाली...

इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करुन प्रणितनं मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती दिली. लक्षवेधी बाब म्हणजे पोलिसांनी (Mumbai Police) देखील या व्हिडीओची तत्काळ नोंद घेत प्रणितला मदत केली.

  मुंबई 28 फेब्रुवारी : कारभारी लयभारी (Karbhari Laybhari) या मालिकेतून नावारुपास आलेल्या अभिनत्री प्रणित हाटे (Pranit hate) हिला भररस्त्यात मारहाण झाल्याचा प्रकार घडला. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करुन ही धक्कादायक माहिती दिली. लक्षवेधी बाब म्हणजे पोलिसांनी (Mumbai Police) देखील या व्हिडीओची तत्काळ नोंद घेत प्रणितला मदत केली. त्यामुळे प्रणितनं आता आणखी एक व्हिडीओ शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत. “आज मी हा खास व्हिडीओ करत आहे. आता मी थोडी बरी आहे. जो काही प्रसंग घडला त्यातून मी सावरले आहे, आणि लवकरच पूर्ण बरी होईन. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सगळ्यात प्रथम मुंबई पोलीस, मुंबई कमिश्नर यांचे अगदी मनापासून आभार मानते. पहिल्यांदा त्यांनीच मला मदतीचा हात दिला. या गोष्टीसाठी मी आयुष्भर तुमची ऋणी राहिन. त्यानंतर दुसरे आभार पंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांचे त्यांनीदेखील एकही सेकंद व्यर्थ न घालवता मला मदत केली, आणि तिसरे आभार तुम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकांचे. तुम्ही इतकं सगळं माझ्यावर मनापासून प्रेम केलंत. असंच प्रेम कायम करत राहा”, असं म्हणत प्रणितनं एका इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत.
  अवश्य पाहा - Mumbai Saga: कोण होता डीके राव? जॉन साकारतोय दाऊदला आव्हान देणाऱ्या डॉनची भूमिका प्रकरण काय आहे? प्रणित आपलं चित्रीकरण संपवून घरी जात होती. ती नेहमीप्रमाणे बस स्थानकावर उभी असताना काही लोक तिथं आले अन् त्यांनी अश्लिल शिवीगाळ करत तिला मारहाण केली. हे लोक तिच्यावर का हल्ला करतायेत याबाबत तिला काहीच कळत नव्हतं. अखेर कशीबशी तिनं पळत जाऊन एक रिक्शा पकडली अन् स्वत:चा जिव वाचवला. रिक्शामध्ये बसल्यानंतर तिनं रडत रडत घडलेला सर्व प्रकार एका व्हिडीओद्वारे सांगितला. हा व्हिडीओ तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केला होता. प्रणित ही मराठी मनोरंजनसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअलिटी शोमधून तिच्या करिअरला सुरुवात झाली. याशोमुळं तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या ती कारभारी लयभारी या मालिकेत गंगा ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actress, Maharashtra, Mumbai, Mumbai police, Shocking news, TV serials, Video viral

  पुढील बातम्या