जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाचा इराणी महिलांना अनोखा पाठिंबा; रागात उचललं हे मोठं पाऊल

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाचा इराणी महिलांना अनोखा पाठिंबा; रागात उचललं हे मोठं पाऊल

उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात सामील झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

**मुंबई, 17 ऑक्टोबर :**बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात सामील झाली आहे.  इराणमधील महिलांच्या हक्कासाठी तिने हे पॉल उचललं आहे. उर्वशीने तिचे केस कापत इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. याबद्दल तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्टही शेअर केली आहे. उर्वशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्वशीने केस कापतानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तिने इराणमधील आंदोलनात मृत्यूमुखी पडलेली महिला आणि उत्तराखंडमधील अंकिता भंडारीसाठी केस कापून पाठिंबा दर्शविला आहे. उर्वशीने पोस्टमध्ये “हिजाब विरोधी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या २२ वर्षीय महसा अमिनीसाठी आंदोलन करत असलेल्या इराणमधील महिला आणि उत्तराखंड प्रदेशातील १९ वर्षीय अंकिता भंडारीला पाठिंबा दर्शविण्यासाठी मी माझे केस कापत आहे”, असं म्हटलं आहे. हेही वाचा - Drishyam 2 Trailer : विजय साळगावकर पुन्हा वाढवणार सस्पेन्स थ्रिलर; ‘दृश्यम 2’ चा धमाकेदार ट्रेलर

जाहिरात

उर्वशी रौतेलाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून, स्त्रिया हे दाखवत आहेत की त्यांना समाजाच्या सौंदर्य मानकांची पर्वा नाही आणि ते कसे कपडे घालतात किंवा कसे वागतात हे ठरवू देत नाहीत. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात आणि एका स्त्रीचा प्रश्न हा संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न मानतात. आता स्त्रीवादात नवा उत्साह येईल.

News18लोकमत
News18लोकमत

इराणमधील हिजाबविरोधी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पसरली आहे. विशेष म्हणजे या चळवळीचे नेतृत्व महिला करत आहेत, ज्यामध्ये जगभरातील बड्या व्यक्ती सामील होत आहेत आणि त्यांना पाठिंबा देत आहेत. आता उर्वशी रौतेलाही या आंदोलनात उतरली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? इराणमधील प्रकरणाची सुरुवात सप्टेंबरमध्ये 22 वर्षीय महसा अमिनीच्या अटकेपासून झाली. नीट हिजाब न घातल्याने मॉरालिटी पोलिसांनी अमिनीला ताब्यात घेतले. मेहसा अमिनी पोलीस ठाण्यात बेशुद्ध पडल्या होत्या आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. अमिनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून तिच्यासोबत कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर इराणमधील अनेक शहरे, गावे आणि गावांमध्ये निदर्शने सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात