मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. या दोघांतील वाद फारच जुना आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीने आरपी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. एवढेच नाही तर ‘मिस्टर आरपी (आरपी)‘सोबतचे नाते तुटल्याची संपूर्ण कहाणीही त्यांनी सांगितली. मात्र, त्यांनी आरपीचे पूर्ण नाव सांगितले नाही. त्यामुळेच या मुलाखतीची क्लिप पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी उर्वशी रौतेला ऋषभ पंतचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला. त्यानंतर, अभिनेत्रीच्या सर्व पोस्ट पंत यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. मात्र, आता उर्वशीने या सर्व अफवांना पूर्णविराम देत तिचा मिस्टर आरपीचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबतचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. या व्यक्तीचं नाव सुद्धा आरपी असंच आहे. त्यावरून चाहत्यांना तिचा खरा ‘मिस्टर आरपी’ सापडला आहे. हा ‘मिस्टर आरपी’ आहे प्रसिद्ध तेलुगू सुपरस्टार राम पोथीनेनी. नुकतंच त्याच्यासह उर्वशीने फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तिने उल्लेख केलेला ‘आरपी’ ऋषभ पंत नसून ‘राम पोथीनेनी’ आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच यूजर्सनी तिला “हाच तो आरपी आहे का?” असा प्रश्न केला आहे. रामसुद्धा सिंगल असल्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये त्यांच्या अफेअरबद्दल सर्वत्र बोलले जात आहे. हेही वाचा - Chinmay Mandlekar: ‘बिट्टा कराटे’ नंतर चिन्मय मांडलेकर पुन्हा साकारणार जबरदस्त भूमिका; नव्या लुकने वेधलं लक्ष उर्वशीच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘अच्छा, हा आरपी आहे’. एकाने लिहिले, ‘ऋषभ भाई बघत आहोत’. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘आता ऋषभ भाईला मिस करू नका?’ एका नेटिझनने लिहिले, ‘ऋषभ भाईचे आता काय होणार?’ त्याचबरोबर काही यूजर्स उर्वशीचे कौतुक करत आहेत. 2018 मध्ये पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघेही अनेकदा लंच-डेटवर दिसले. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र, काही वेळानंतर पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची बातमी सोशल मीडियावर आली. मात्र, दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांना ब्लॉक केल्याचे नंतर समोर आले.
खरंतर राम आणि उर्वशी आगामी प्रोजेक्ट्साठी एकत्र आल्याची माहिती आहे. तेलुगू सिनेदिग्दर्शक बोयापती श्रीनु यांच्या आगामी चित्रपटामध्ये राम पोथीनेनी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये उर्वशी एका आयटम सॉंगवर डान्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच हैदराबादमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी उर्वशीने या दोघांचा पोस्ट केलेला फोटो हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. आता हे दोघे खरंच रिलेशनशिप मध्ये आहेत, कि हे फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी आहे ते येणारा काळच सांगेल.