मुंबई, 27 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल राउंडर अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. या अभिनेत्याने मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्याने आता आज मराठीसह हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याची शिवराज अष्टक मधील सिनेमांतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर ‘द कश्मीर फाईल्स’ मधून त्याने बिट्टा कराटे या खलनायकाची भूमिका निभावली. त्याचं विशेष कौतुक झालं. लवकरच त्याला ‘सुभेदार’ चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी त्याच्या नवीन चित्रपटाचा लूक समोर आला आहे. लवकरच चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार असून आता त्यातील एक एक व्यक्तिरेखा समोर येऊ लागल्या आहेत. या चित्रपटाच्या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. ललित प्रभाकर या चित्रपटात ‘सनी’ ही भूमिका साकारणार आहे तर आता या चित्रपटातील विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारत आहे. हेही वाचा - VIDEO: ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाही…’; बिग बॉसच्या घरात हे काय बोलून गेल्या अमृता फडणवीस? चिन्मय मांडलेकरने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर रिलीज चाहत्यांना ही बातमी दिली. यावेळी त्याने लिहिलंय कि, ‘‘सनीचा दादा, सनीसाठी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन.. कपटी माणूस! पण.. असा एक विलन तर आयुष्यात पाहिजे ना..!’’ आता हा टिझर पाहून चिन्मयला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे.
व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.आता हा टिझर पाहून चिन्मयला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे.
मागच्या बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत होता. यात मराठीतील अनेक कळकरांनी त्यांची गोष्ट सांगत सहभाग नोंदवला होता. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आले. सुपरहिट चित्रपट ‘झिम्मा’च्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.