Home /News /entertainment /

उर्वशीला नडला मोबाईलचा अतिवापर; या व्याधीसाठी अखेर करावं लागलं ऑपरेशन

उर्वशीला नडला मोबाईलचा अतिवापर; या व्याधीसाठी अखेर करावं लागलं ऑपरेशन

‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagi Kay) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली उर्वशी सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे त्रस्त आहे.

    मुंबई 9 जुलै: आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagi Kay) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली उर्वशी सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे त्रस्त आहे. (Urvashi Dholakia diagnosed with tennis elbow) मोबाइलच्या अतिवापरामुळे टेनिस एल्बो झाल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने केला आहे. शत्रुघ्न सिन्हांनी प्रेयसीला धावत्या ट्रेनमध्ये केलं होतं प्रपोज; पाहा शॉटगनची थ्रीलिंग Love story उर्वशीनं अलिकडेच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने टेनिस एल्बो झाल्याची धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बो झाल्याचं निदान झालं. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे मला टेनिस एल्बो झाला आहे. कारण माझं संपूर्ण काम आजकाल मोबाइलवरच असतं. मला माझ्या शोचं संपूर्ण काम फोनवरच करावं लागतं. या शोचे सर्व एपिसोड मी स्वत: एडिट करते. त्यामुळे दिवसभर मला मोबाइल फोन पकडून काम करावं लागतं. त्याचाच हा दुष्परिणाम आहे.” आज उर्वशीचा वाढदिवस आहे. 42 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान अनेकांनी टेनिस एल्बोबाबत चिंता व्यक्त करत तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. Guru Dutt Birth Anniversary: गुरुदत्त-वहिदा रेहमान यांची Love Story का राहिली अर्धवट? टेनिस एल्बो म्हणजे काय? या व्याधीचे नाव टेनिस एल्बो असं असलं तरी ही व्याधी केवळ टेनिस खेळाडूंना होतो हा गैरसमज आहे. अनेकदा काही फेकण्याच्या आणि मैदानी खेळ तसेच अॅथलिटीक्स खेळाडूंना ही व्याधी होते. कोपराचा अतिवापर केल्याने ही व्याधी होते. गृहिणी तसेच जास्त वेळ व्यायामशाळेत जाणाऱ्या लोकांना ही व्याधी होते. यामुळे कोपराला प्रचंड वेदना होतात. कोपराजवळील स्नायूंची अधिक हालचाल झाल्याने ही व्याधी होते. विशेष म्हणजे कोपराजवळ ही व्याधी होत असली तरी तेथील स्नायूंमुळे मनगटांच्या हालचाली अवलंबून असतात. त्यामुळेच टेनिस एल्बोची व्याधी झालेल्यांना मनगटाजवळही वेदना होतात. मनगट उचलण्याचा प्रयत्न केल्यास कोपराजवळ प्रचंड वेदना होतात. टायपिंग करणे, एखादी गोष्ट पकडणे यांसारख्या गोष्टीही करणे अशक्य होते.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Health, Mobile, Tv actress

    पुढील बातम्या