मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शत्रुघ्न सिन्हांनी प्रेयसीला धावत्या ट्रेनमध्ये केलं होतं प्रपोज; पाहा शॉटगनची थ्रीलिंग Love story

शत्रुघ्न सिन्हांनी प्रेयसीला धावत्या ट्रेनमध्ये केलं होतं प्रपोज; पाहा शॉटगनची थ्रीलिंग Love story

कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय असो, की प्रेयसीला प्रपोज करणं असो, त्यांच्या करिअरमध्ये सर्वत्र थ्रीलचं पाहायला मिळतं.

कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय असो, की प्रेयसीला प्रपोज करणं असो, त्यांच्या करिअरमध्ये सर्वत्र थ्रीलचं पाहायला मिळतं.

कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय असो, की प्रेयसीला प्रपोज करणं असो, त्यांच्या करिअरमध्ये सर्वत्र थ्रीलचं पाहायला मिळतं.

मुंबई 9 जुलै: चित्रपटात धमाकेदार अॅक्शन सीन्स करून थक्क करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचं खरं आयुष्य देखील थ्रीलनं भरलं आहे. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय असो, की प्रेयसीला प्रपोज करणं असो, त्यांच्या करिअरमध्ये सर्वत्र थ्रीलचं पाहायला मिळतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांनी प्रेयसी पूनम सिन्हा यांना चालत्या ट्रेनमध्ये प्रपोज केलं होतं. (Shatrughan Sinha Love Story) अर्थात त्यांच्या याच धाडसी प्रवृत्तीमुळे पूनम त्यांच्या प्रेमात पडल्या. अन् आज त्यांच्या सुखी संसाराला तब्बल 41 वर्ष झाली आहेत.

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी ते रीना रॉय यांना डेट करत होते. मात्र त्या पार्टीत पूनम यांचं सौंदर्य पाहून शत्रुघ्न सिन्हा जणू घायाळच झाले होते.

Guru Dutt Birth Anniversary: गुरुदत्त-वहिदा रेहमान यांची Love Story का राहिली अर्धवट?

पूनम यांनी मिस यंग इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती त्यामुळे त्याकाळी त्यांची प्रचंड चर्चा होती. अनेक मोठमोठे अभिनेते त्यांच्याशी सलगी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनीच त्यांना इम्प्रेस केलं. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली अन् पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये पाकिजा चित्रपटातील अपने पांव जमीन पर मत रखिएगा…’ हा डायलॉग म्हणत पूनम यांना लग्नासाठी मागणी घातली होती.

ऐश्वर्याआधी संगीता बिजलानीवर होतं सलमान खानचं प्रेम; लग्नही ठरलं होतं पण..

सुरुवातीला त्यांच्या लग्नाला पूनम यांच्या कुटुंबीयांचा विरोधात होता. कारण त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा एक स्ट्रगलिंग अॅक्टर होते. परंतु हिरा मोती या चित्रपटानं त्यांच्या करिअरमध्ये एक जबरदस्त वळण आलं. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांच्याकडे प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात आल्या. परिणामी 1980 साली कुटुंबीयांच्या संमतीनं दोघांचं लग्न झालं. लग्नापूर्वी जवळपास सात वर्ष कुठलाही गाजावाज न करता गुपचूप एकमेकांना डेट करत होते.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Love story, Shatrughan sinha