• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Guru Dutt Birth Anniversary: गुरुदत्त-वहिदा रेहमान यांची Love Story का राहिली अर्धवट?

Guru Dutt Birth Anniversary: गुरुदत्त-वहिदा रेहमान यांची Love Story का राहिली अर्धवट?

त्यांची लव्हस्टोरी त्या काळात प्रचंड चर्चेत होती. दोघांचं एकमेकांवर प्रेमही होतं परंतु तरी देखील त्यांची प्रेमकथा अखेर अर्धवट राहिली.

 • Share this:
  मुंबई 9 जुलै: गुरुदत्त (Guru Dutt) हे भारतीय सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकं करून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या गुरुदत्त यांनी पुढे सिनेसृष्टीत आपली मक्तेदारीच निर्माण केली होती असं म्हटलं जायचं. (Guru Dutt Movie) ‘हम एक है’, ‘सीआयडी’, ‘आर पार’, ‘काला बाझार’, ‘बहुरानी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज गुरुदत्त यांचा स्मृतीदिन आहे. (Guru Dutt Birth Anniversary) या निमित्तानं आज पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींना चाहत्यांनी उजाळा दिला आहे. गुरुदत्त म्हटलं की पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचं. त्यांची लव्हस्टोरी त्या काळात प्रचंड चर्चेत होती. दोघांचं एकमेकांवर प्रेमही होतं परंतु तरी देखील त्यांची प्रेमकथा अखेर अर्धवट राहिली. सलमान खानवर आर्थिक फसवणुकीचा आरोप; पोलिसांनी बजावलं समन्स गुरुदत्त यांनी एका पार्टीमध्ये वहिदा रेहमान यांना पाहिलं होतं. पाहताक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. अन् त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये काम करावी अशी विंनती वहिदा यांना केली. रेहमान यांना देखील अभिनयाची आवड होती. शिवाय गुरुदत्त त्याकाळचे लोकप्रिय कलाकार होते. परिणामी त्यांनी त्वरित होकार दिला. मग त्यांनी 'प्यासा', 'चौदहवीं का चांद', 'कागज़ के फूल', 'साहिब', 'बीवी और गुलाम' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेले वहिदा रेहमान आणि गुरुदत्त एकमेकांच्या प्रेमात पडले. ही ग्लॅमरस अभिनेत्री होणार बाहुबलीची आई; 200 कोटींच्या सीरिजसाठी करतेय खास तयारी परंतु गुरुदत्त विवाहित होते. शिवाय त्यांना तीन मुलं होती. त्यामुळं दोन्ही कुटुंबीयांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. या प्रकरणामुळं गुरुदत्त यांची मुलं, पत्नी त्यांना सोडून गेले. अन् दुसरीकडे कुटुंबीयांच्या विरोधामुळं वहिदा रेहमान देखील त्यांच्या आयुष्यात राहणार नव्हत्या. अखेर एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळं ते नैराश्येत गेले. आयुष्यातील या कठीण प्रसंगी ते एकटे पडले होते. शेवटी वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. परिणामी वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांची लव्हस्टोरी अर्धवट राहिली.
  Published by:Mandar Gurav
  First published: