Home /News /entertainment /

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या या कार अपघाताची चौकशी करत आहेत.

    मुंबई 25 जुलै: बिग बॉस (Bigg Boss) या शोमधून नावारुपास आलेली अभिनेत्री याशिका आनंद (Yashika Aannand) हिचा भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात याशिकाची मैत्रीण वल्लिचेट्टी भवानी हिचा मृत्यू झाला. तर याशिका गंभीर जखमी झाली आहे. (Yashika Aannand meets with a car accident) चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या या कार अपघाताची चौकशी करत आहेत. प्रशांत दामले का नाकारतात चित्रपटांच्या ऑफर? 20 वर्ष करतायेत रंगभूमीवर काम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत एकूण चार लोक प्रवास करत होते. चारही जण दारूच्या नशेत होते. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् गाडी डिव्हायडरला आपटली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे आपटल्यानंतर गाडी गटांगळ्या खाऊन खड्ड्यात पडली. या दरम्यान गाडीचा पार चक्काचूर झाला. आतले चारही प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी एका तरुणीचा तर जागीच मृत्यू झाला. उर्वरीत तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. 'राज निर्दोष आहे, ते पॉर्न नाही तर...' पतीच्या बचावासाठी शिल्पाने चौकशीत केला असा दावा याशिका आनंद एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बिग बॉस तमिळमुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. बोल्ड फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. अलिकडेच ती 'ध्रुवंगल पथिनारू' या चित्रपटात झळकली होती. याशिकाच्या अपघातामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment, South actress

    पुढील बातम्या