मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न थांबवा’; बाळाला जन्म देताच उर्मिलाचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर

‘मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न थांबवा’; बाळाला जन्म देताच उर्मिलाचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर

गरोदरपणातील फोटोंमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. (Urmila Nimbalkar baby) मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर एक भलीमोठी पोस्ट लिहित तिने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

गरोदरपणातील फोटोंमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. (Urmila Nimbalkar baby) मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर एक भलीमोठी पोस्ट लिहित तिने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

गरोदरपणातील फोटोंमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. (Urmila Nimbalkar baby) मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर एक भलीमोठी पोस्ट लिहित तिने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

मुंबई 14 ऑगस्ट: दुहेरी (Duheri) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हिडीओ आणि ऑनलाईन पोस्टच्या माध्यमातून ती विविध प्रकारचे किस्से शेअर करत असते. नुकतेच तिने बाळाला जन्म दिला. गरोदरपणातील फोटोंमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. (Urmila Nimbalkar baby) मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर एक भलीमोठी पोस्ट लिहित तिने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

उर्मिलाचं सी सेक्शन डिलिव्हरी झालं. डिलिव्हरीनंतर बाळ आणि उर्मिला दोघंही सुदृढ आणि सुखरुप आहेत. या पोस्टमध्ये उर्मिलाने तिचं सीझर डिलिव्हरी का झालं, यामागची कारणं लिहिली. त्यानंतर तिने सीझर डिलिव्हरीबाबत तिचं मतं मांडलं.

किम शर्माचा हॉट पोल डान्स; Ex बॉयफ्रेंड युवराज सिंगने दिली अशी कमेंट

काय म्हणाली उर्मिला?

अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते.

माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत पण तरीही सीझर होण्याची माझी कारणे खालील प्रमाणे

१. My pelvic bone structure and baby’s head was not in the proportion.

म्हणजेच माझा ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते.

बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची normal delivery शक्य नसते.

‘खतरों के खिलाडी’मध्ये अतृप्त आत्मा? भूत पाहून दिव्यांका त्रिपाठीची बोलती बंद

यांचे कारण अनुवंशिकता.

My baby’s head was bigger than my bone structure which is impossible to change even if you exercise or have perfect diet.

२. An umbilical cord that is wrapped around a baby's body twice so my baby couldn’t fix himself in my pelvis.

बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी emergency नव्हती पण त्यामुळे त्याला बाहेर येणे किंवा खाली घसरणे केवळ अशक्य होते.

Pregnancy diet, Pregnancy मधील व्यायाम हे चोख पार पाडून मीही normal delivery होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि normal साठीच प्रयत्न करायला हवा परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच normal आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. Normal असो वा C section, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.

First published:

Tags: Social media troll, Viral post