मुंबई 14 ऑगस्ट: खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) हा छोट्या पडद्यावरील सध्याचा सर्वात चर्चेत असलेल्या शोंपैकी एक आहे. या शोचा सध्या 11 सीझन सुरू आहे. शोमधील सर्वच कलाकार स्पर्धा जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये भूत पाहून दिव्यांका प्रचंड घाबरलेली दिसत आहे.
गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिव्यांका यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोघंही अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. यावेळी राहुलने तिच्यासोबत एक हॉरर प्रँक केला. कलर्स वाहिनीने इन्स्टाग्रामवर या अनोख्या प्रँकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिव्यांका आणि राहुल रात्री कारमधून प्रवास करत असतात. खतरों के खिलाडीचं शूटिंग संपवून ते हॉटेल रूमवर जात असतात. तेवढ्यात त्यांच्या कारसमोर एक मुलगी येऊन उभी राहते. त्या मुलीचा अवतार एखाद्या भूतासारखा दिसत होता. हा सर्व प्रकार पाहून दिव्यांका घाबरली. अन् ती जोरजोराने किंचाळू लागली. अखेर हा प्रँक असल्याचं तिच्या लक्षात आलं.
8 वर्षांपूर्वीच होणार होतं रिया कपूरच लग्नं; अतिशय फिल्मी आहे सोनमच्या बहिणीची लव्हस्टोरी
View this post on Instagram
दिव्यांका ही शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. प्रत्येक टास्कमध्ये ती जबरदस्त कामगीरी करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर 11 व्या सीझनमध्ये तीच जिंकणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आस्था गील आणि राज जैन शोमधून बाहेर पडले. दरम्यान आदित्य सिंह दिव्यांकाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos