• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • किम शर्माचा हॉट पोल डान्स; Ex बॉयफ्रेंड युवराज सिंगने दिली अशी कमेंट

किम शर्माचा हॉट पोल डान्स; Ex बॉयफ्रेंड युवराज सिंगने दिली अशी कमेंट

किमने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती पोल डान्स करताना दिसून येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 ऑगस्ट- ‘मोह्ब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) सतत कोणत्या नं कोणत्या कारणाने चर्चेत असते. किमच्या आयुष्यात अनेक रिलेशनशिप, ब्रेकअप झाले आहेत. त्यामुळे सतत या गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर होतंचं असते. नुकताच किम लिएंडर पेससोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. तर आत्ता आपला एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंगमुळे (Yuvraj Singh) चर्चेत आली आहे.
  किम शर्मा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या पोस्टला दाद देत असतात. किम एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. किमने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती पोल डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर किमला अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. (हे वाचा-Hotness Alert! रश्मी देसाईच्या किलर LOOKची होतेय जोरदार चर्चा ) मात्र एका कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही कमेंट् आहे, भारतीय क्रिकेटर आणि किमचा एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंगची. युवराज सिंगने या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे. कमेंट करत युवराजने म्हटलं आहे,’वाह, काय सूर आहे. मॅडम कोणतं गाणं गात आहात?’ युवराजच्या या मजेशीर कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. (हे वाचा: जहांगीरची पहिली विदेश ट्रीप; सैफ-करीना मुलांसोबत एयरपोर्टवर झाले स्पॉट) याचं कारणही तितकचं खास आहे. कारण युवराज आणि किम हे कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. हे दोघे तब्बल 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर यांचा ब्रेकअप झाला होता. या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहण्यात येत होतं. सध्या किम टेनिसपटू लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर युवराज सिंगने 2016 मध्ये ‘बॉडीगार्ड’फेम अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: