मुंबई, 29 ऑक्टोबर : अभिनेत्री आणि आता यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख बनवणारी सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि युट्युबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. आपल्या सहज सुंदर बोलण्याच्या आणि सांगण्याच्या शैलीनं उर्मिलानं सगळ्यांची मनं जिंकली. उर्मिला आज अनेक मुलींसाठी, आयांसाठी इन्स्पिरेशन बनली आहे. तिच्या लहान लहान टिप्स देखील अनेक गोष्टी शिकवून जातात. उर्मिलानं तिच्या याच गुणांमुळे आज युट्यूबर 8 लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे आणि मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे. उर्मिला सध्या तिच्या बाळाबरोबर एन्जॉय करताना दिसत असते. नुकतंच तिने अथांगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्मिलाचा लेक अथांग सुद्धा तिच्या चाहते मंडळींमधला चर्चेचा विषय असतो. अथांगच्या आयुष्यात होणारे छोटे मोठे मजेदार अपडेट्स, त्याचे गोड व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत आली आहे. आजही तिने अथांगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उर्मिलाने छान आवरलं आहे. दिवाळीचा हा व्हिडीओ असून पारंपरिक वेषात उर्मिला दिसत आहे. तिने छान मेकअप करत दागिने घातले आहेत. यावेळी उर्मिलाच्या कडेवर तिचा लेक आहे. हेही वाचा - Prarthana Behere: ‘वयाच्या तिशीतही तुम्हाला मुलं नसतात तेव्हा’; आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरेची भन्नाट पोस्ट या व्हिडिओत उर्मिला अथांगला विचारतेय कि, ‘‘आई कशी दिसते’’ त्यावर उर्मिला लेक छान छान करत प्रतिक्रिया देतो. अथांगच्या या प्रतिक्रियेने उर्मिला चांगलीच भारावली. उर्मिलाचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते सुद्धा चांगलेच खुश झाले आहेत. त्यांनी मस्त कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवर उर्मिलाच्या एका चाहत्याने तर ‘बाळापेक्षा जास्त क्युट आईच’ अशी कमेंट केली तर दुसऱ्या चाहत्यांनी ‘किती गोड दिसताय’, ‘किती निरागस आहात दोघेही’, ‘अथांगची आई नेहमीच छान दिसते’ अशा कमेंट केल्या आहेत. अथांग सध्या दीड वर्षांचा आहे. त्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टी उर्मिला सोशल मीडियावर शेअर करत असते.
उर्मिलानं अथांगच्या जन्मानंतर स्वत:ला चांगलंच फिट ठेवलं आहे. तिच्या आरोग्याकडे ती विशेष लक्ष देताना दिसते. मोजक्याच मालिका आणि सिनेमात अभिनयाची आणि डान्सची झलक दाखवून उर्मिला निंबाळकर सध्या यूट्यूबवर जास्त रमली आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवरून फॅशनचे धडे गिरवणाऱ्या तिच्या लाखो फॉलोअर्सचं लक्ष तिच्या नव्या पोस्टकडे लागलेलं असतं. मेकअप आणि स्टाइलचे पाठ शिकवणारी उर्मिला स्वत:ही सतत नवे प्रयोग करून तिचा लुक शेअर करत असते. आता नुकताच उर्मिलाने साडीतला लुक शेअर केला आहे.
उर्मिलाच्या फॅशन आणि मेकअपबाबत टीप्स देणाऱ्या व्हिडिओला जोरदार हिट मिळतातच पण तिच्या या स्पेशल फोटोंनीही कमेंटचा गल्ला जमवला आहे. उर्मिलाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला, त्यानंतर ती काही दिवस यूट्यूबवरून गायब होती, आता मात्र पुन्हा उर्मिला तिच्या व्हिडिओबरोबरच फोटोसेशन करतानाही दिसते. आता तिचा आणि अथांगचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.