मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. कंगना मुंबईत आली आहे. एरवी मुंबईविरोधात बोलणारी कंगना आता मात्र मुंबईचं कौतुक करू लागली आहे. माझी प्रेमळ मुंबई असा उल्लेख तिनं केला आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी यावरून कंगनाला चांगलंच लक्ष्य केलं आहे. चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली आहे. ती मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे”, असं ट्विट कंगनानं केलं आहे.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra 🙏 pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे. हे वाचा - त्यादिवशी झालेल्या चुकीबद्दल अमिताभ बच्चननी महिलेची हात जोडून मागितली माफी काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. तसंच मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ (POK) असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर केवळ सरकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं मनही दुखावलं गेलं होतं. मुंबईतील रोष पाहता गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती. शेतकरी आंदोलनावरूनही पुन्हा ती ट्रोल झाली होती. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि तिच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, मिका सिंग यांच्याविरोधातही कंगनाने काही वक्तव्य केली होती. हे वाचा - रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण काही दिवसांपूर्वी थलायवी सिनेमाचं शूटिंग पूर्ण करुन कंगना सुट्ट्यांचा आनंद घेत होती. तिच्या हातात सध्या तेजस आणि धाकड असे दोन चित्रपट आहेत. थलायवी आणि तेजस हे तिचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मानले जातात. कंगना मुंबईत आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.