मराठी बातम्या /बातम्या /देश /

रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण

रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण

एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष (Political party) स्थापन करणार नाही. पण तामिळनाडूच्या लोकांसाठी नेहमी कार्यरत राहील.

एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष (Political party) स्थापन करणार नाही. पण तामिळनाडूच्या लोकांसाठी नेहमी कार्यरत राहील.

एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष (Political party) स्थापन करणार नाही. पण तामिळनाडूच्या लोकांसाठी नेहमी कार्यरत राहील.

    हैदराबाद, 29 डिसेंबर: काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनी राजकीय पक्ष (Political Party) काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळं राजकीय वातावरणात थोडंसं ढवळून निघालं होतं. दक्षिणात्य राज्यांत अभिनेत्यांना दिला जाणारा मान सन्मान पाहता आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणूकांमध्ये (Tamilnadu Assembly election) मतदार कोणाच्या पारड्यात आपलं जनमत टाकणार याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. तसेच अभिनेता रजनीकांत जर राजकीय मैदानात उतरले तर ते युती कोणत्या पक्षाशी करतील? की भाजपाची बी टीम म्हणून भूमिका निभावतील? अशा अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. पण आता तुर्तास तरी या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्यावा लागणार आहे. कारण रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी याबद्दलची घोषणा मंगळवारी केली. एक जाहीर निवेदन देताना रजनीकांत म्हणाले की, आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. पण तामिळनाडूच्या लोकांसाठी नेहमी कार्यरत राहू. रजनीकांत यांनी पुढे आपल्या निवेदनात म्हटले की, गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत झालेला बिघाडाला, ते देवाचा इशारा मानतात. त्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष न बनविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना असं वाटू नये की त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं आहे, म्हणून योग्य वेळी माघार घेत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी आपण राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच आगामी तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष निवडणूकीच्या मैदानात उभा राहील आणि रजनीकांत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असंही म्हटलं जात होतं. पण रजनीकांत हैदराबादमध्ये आपल्या चित्रपटाचं शूटिंग करत असताना अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, कालच त्यांना येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. DMK, AIADMK, कॉंग्रेस, भाजप याव्यतिरिक्त कमल हसन यांचा पक्ष आणि रजनीकांत या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता तुर्तास तरी प्रकृतीचं कारण देत सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन नाही करणार हे अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Politics

    पुढील बातम्या