मुंबई 11 मार्च: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काही लोकांनी धक्काबुक्की केल्यामुळं त्यांच्या पायाला जखम झाली आहे. या हल्ल्यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील एक फोटो पोस्ट करुन त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. “जी गोष्ट तुम्हाला तोडू शकत नाही ती तुम्हाला आणखी मजबूत करते. अशी ताकत आम्ही यापूर्वी पाहिलेली नाही. बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल. ममतादीदी तुम्ही पुन्हा मैदानात कधी उतराल याची आम्ही वाट पाहात आहोत.” अशा आशयाचं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
अवश्य पाहा - ठाकरे की फडणवीस? अरविंद जगताप यांचा ब्लॉक वाचून मराठी माणसाला बसेल धक्का
"What doesn't break you,makes you stronger" and we certainly know it for sure in this case as rarely has one seen such strength n vigour. Wishing the Bengal Tigress @MamataOfficial ji a speedy recovery #WomanOfCourage pic.twitter.com/x8cvQl2WOO
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 11, 2021
माझ्यावर हल्ला झालाय, असा दावा ममतांनी बुधवारी केला. ‘मी माझ्या गाडीबाहेर उभी होते व गाडीचे दार उघडे होते. मी मोटारीत बसत असताना काही लोकांनी दार ढकलले, ते माझ्या पायावर आपटले. याने झालेल्या जखमेमुळे माझा पाय सुजला असून मला तापासारखे वाटत आहे’, असे ममता म्हणाल्या. दरम्यान सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हे नक्कीच ‘कारस्थान’ असल्याचा आरोप ममता यांनी केला. शिवाय त्यांना झेड प्लस सुरक्षाकवच असल्यामुळे, त्यांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, ममतांवरील या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mamata banerjee, Urmila Matondkar