मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ठाकरे की फडणवीस? अरविंद जगताप यांचा ब्लॉग वाचून मराठी माणसाला बसेल धक्का

ठाकरे की फडणवीस? अरविंद जगताप यांचा ब्लॉग वाचून मराठी माणसाला बसेल धक्का

आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 11 मार्च: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा शो खळखळवून हसवणाऱ्या विनोदांसोबतच अंतर्मुख करणाऱ्या पत्रांमुळं देखील चर्चेत असतो. या शोमध्ये पत्रांच्या माध्यमातून देशभरातील घटनांवर भाष्य केलं जातं. दरम्यान ही पत्र लिहिणाऱ्या लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांचा एक नवा ब्लॉक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नोकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे,” अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांनी एकच खळबळ माजवली आहे. (Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray)

ब्लॉकमध्ये काय म्हणाले अरविंद जगताप?

अरविंद जगताप यांनी आपल्या ब्लॉगमधून मराठी माणसाच्या सध्याच्या परिस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. “मराठी माणसांचा महाराष्ट्र. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण. पण आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच, “मराठी माणूस व्यवसायात मागे का आहे यावर फक्त चर्चाच होतात. कृती होत नाही. अगदी अगदी छोट्या गावात सचोटीने व्यवसाय करणारे व्यापारी अमराठी आहेत. त्यांची एकी आहे. एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती आहे. आपल्या लोकांना भांडवल पुरवण्याची तयारी आहे. साधा भंगार सामानाचा व्यापार बघा, लाकडांच्या वखारी बघा, देशी दारूचा व्यवसाय बघा ठराविक नावं दिसतात वर्षानुवर्ष. मोठमोठ्या बिल्डर्सची नावं बघा. मुंबईतल्या प्रमुख पन्नास उद्योगपतींची यादी बघा. देश आपला आहे. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. मोठे होतात. व्हायलाच हवेत. पण मराठी माणूस या सगळ्यात कुठे आहे?,” असा प्रश्न जगताप यांनी आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच उपस्थित केलाय.

राजकीय संस्थानांची मक्तेदारी जास्त भयंकर

राजकीय संस्थानांची मक्तेदारी जास्त भयंकर असल्याचेही जगताप यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. “शिवाजी महाराजांनी अनेक दूरदर्शी निर्णय घेतले होते. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वतनदार वठणीवर आणले होते. त्यांना मनमानी करायची परवानगी नव्हती. पण नंतर ती पद्धत बंद झाली. गेल्या कित्येक वर्षात राज्यातल्या नेतृत्वाने प्रत्येक तालुका कुणाला तरी आंदण दिलाय. त्यामुळे राजकीय वतनदारी सुरु झाली. घराणेशाही मजबूत झाली. इंदिरा गांधींनी संस्थानाचे अधिकार काढून घेतले. पण राजकीय संस्थानांची मक्तेदारी सुरु झाली. जी जास्त भयंकर आहे. पक्ष, विचारधारा यापेक्षा कित्येक तालुके, जिल्हे एखाद्या राजकीय घराण्याचे गुलाम बनले. हे सत्ता असलेल्या कुठल्याही पक्षात घुसून बसणारे नवे संस्थानिक इंग्रजांपेक्षा भयंकर जुलुमी बनले. आजही कित्येक मतदारसंघात ठराविक नेत्यांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लागलेले दिसतात. त्यांच्या गाड्या आल्यावर बाकी लोकांनी गाड्या बाजूला घ्यायच्या असतात. त्यांच्यापेक्षा महागडी गाडी कुणी घ्यायची नसते. त्यांच्यापेक्षा मोठं घर बांधायचं नसतं. अशा नेत्यांच्या मतदाराने मोठा उद्योग उभा करावा ही अपेक्षा आपण ठेवणार कशी? अशी माणसं सामान्य माणसांना मोजेनाशी होतात. गुंड मवाली आणि खंडणीखोर लोक भोवती गोळा करतात. मग मतदारसंघातल्या सगळ्या उद्योजकांकडून हप्ते वसुली सुरु होते. अशावेळी मराठी माणसाची मानसिकता बनते की कुणाच्या डोळ्यात यायचं नाही. आपण भले आपलं काम भलं. मग गुंतवणूक नको. मोठे उद्योग नको. गाड्या नको. रिस्क नको. पर्यायाने कुठेतरी नोकरी केलेली बरी. कायम हेच चालू राहिलं,” असं स्थानिक पातळीवरील राजकारणाबद्दल बोलताना जगताप सांगतात.

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचू शकता - https://www.arvindjagtap.com/singleshow?id=164&&path=kathas&fbclid=IwAR0Xg5by48orR4RlknK433o2VpxRKgVn7Fve2eGvZ0MkIV6t_iHeLZKREqo

First published:

Tags: Comedy, Devendra Fadnavis, Entertainment, Maharashtra, Uddhav thackeray