जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात; हात सुटला अन् झाली अशी फजिती

VIDEO: झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात; हात सुटला अन् झाली अशी फजिती

उर्फी जावेद

उर्फी जावेद

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या असामान्य ड्रेसिंग सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : आपल्या फॅशनमुळे उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. नुकतंच उर्फीचं ‘हाय ये है मजबूरी’ गाणं प्रदर्शित झालं. उर्फी जावेदचे हे गाणे 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन आहे. या नवीन गाण्यात श्रुती राणेने तिचा आवाज दिला असून राजेश मंथन यांचे बोल आहेत. या गाण्याच्या एक BTS व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘हाय ये है मजबूरी’ गाण्याचा एक BTS व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये ती शूटिंगदरम्यान झुल्यावर उभी असल्याचे दिसत आहे. पण अचानक तिचा तोल बिघडला आणि ती पडली. तेथे उपस्थित असलेल्या टीमने तिला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑरेंज कलरच्या साडीत दिसत आहे. यामध्ये उर्फीचा खूप बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पहायल मिळतोय.

जाहिरात

उर्फीला पडताना पाहून चाहत्यांनी तिच्याविषयी चिंता व्यक्त केली. ‘तू ठीक तर आहेस ना’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. उर्फीने नुकताच तिचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. तिच्या पार्टीत तिचा माजी प्रियकर पारस कालनावतही उपस्थित होता. या पार्टीचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

उर्फी जावेदने टीव्ही मालिकांमध्ये आणि  बिग बॉस  ओटीटीमध्येही आपले कौशल्य दाखवले. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फीने स्वतःला सिद्ध केले. रोज उर्फी चर्चेत असते. शिवाय तिच्या अतरंगी फॅशनने सगळ्यांना थक्क करत असते. ती आता एक सोशल मीडिया स्टार झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात