जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली 'माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर...'

Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली 'माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर...'

 Urfi javed

Urfi javed

उर्फी जावेद जेव्हा जेव्हा ती पापाराझींसमोर येते तेव्हा ती सर्वांशी मोकळेपणाने बोलत असते पण यावेळी ती काहीशी रागावलेली दिसली. ती पापाराझींवर चांगलीच भडकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 सप्टेंबर-  उर्फी जावेद म्हटलं तरी पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे तिची अंतरंगी फॅशन. निरनिराळ्या फॅशन सेन्सनं उर्फी नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके लूक आणि हटके स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा नेहमीच  खिळून असतात. तिचे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात.  मात्र तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ती जेवढी चर्चेत असते तेवढीच ती ट्रोलरच्या निशाण्यावरही असते. अनेकवेळा तिला तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल केलं जातं. मात्र उर्फी ट्रोलकडे लक्ष न देता नेहमी नवनवीन ड्रेस, स्टाईल तयार करत असते. अशातच पुन्हा एकदा उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिने मीडियावर केलेली टीका आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमादरम्यान आलेल्या मीडियावर भडकली.  त्याची सध्या चर्चा होत आहे. उर्फी जावेद जेव्हा जेव्हा ती पापाराझींसमोर येते तेव्हा ती सर्वांशी मोकळेपणाने बोलत असते पण यावेळी ती काहीशी  रागावलेली दिसली. ती पापाराझींवर चांगलीच भडकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या पापाराझीं चांगलेच धारेवर धरले होते. मंगळवारी संध्याकाळी उर्फी मुंबईतील अंधेरी येथे एका कार्यक्रमात पोहोचली. हा एक म्युझिक लॉन्च कार्यक्रम होता. यावेळी ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली. उर्फीने या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर ती रेड कार्पेटवर पोझ देत असताना कोणीतरी तिच्या कपड्यांवर कमेंट केली ज्यामुळे उर्फी भडकली.

जाहिरात

उर्फी म्हणाली, ‘‘मित्रांनो, मी हे ऐकून घ्यायला इथे आलेले नाही. जर तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची असेल तर आधी  तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणीला आणि आईला अशा कमेंट द्या. आजच्या नंतर कोणीही माझ्या कपड्यांवर कमेंट करणार नाही…मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही.  मी तुम्हा सर्वांचा खूप आदर करते आणि बदल्यात तुमच्याकडूनही  तशीच अपेक्षा करते.’’ हेही वाचा - Bigg Boss 16 : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची छोट्या पडद्यावर एंट्री; राज कुंद्रा ‘बिग बॉस 16’ मध्ये?; चर्चांना उधाण दरम्यान, उर्फी जावेदनं शेअर केलेला हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीची दादा द्यावी लागेल कारण ती कुठून काय संकल्पना घेऊन येते आणि नवनवीन कपडे बनवते कुणीही तर्क लावू शकत नाही.  पण आता यापुढे तिच्या कपड्यांवर तिच्यासमोर  बोलायची कोणी हिम्मत करणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात