मुंबई, 7 मार्च: अक्षय कुमारची (Akshay Kumar ) बायको ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna ) म्हणजे एक परखड व्यक्तिमत्त्व. अनेक मुद्यावरचे तिचे उपरोधिक टोमणे, फटके म्हणजे हेडलाईन्सचा विषय. आताही तिने हिजाबच्या वादापासून ते युक्रेन रशियामधील युद्ध यांसारख्या मुद्यावर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर एक नोट पोस्ट करत तिने आपले परखड मत व्यक्त केले आहे.
कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य करत ट्विंकल खन्ना म्हणाली, महिलांना काय परिधान करायचे, याची निवड करण्याचा अधिकार केवळ महिलांना हवा. या वादावर आपले मत व्यक्त करताना ट्विंकल खन्ना म्हणाली की, बुरखा, हिजाब आणि घूंघट यांचाही एक ना एक प्रकारे धार्मिक आणि सांस्कृतिक निर्मितीत योगदान आहे. परंतु मी कोणत्याही प्रकारच्या पडद्याला समर्थन देत नाही.
मात्र, या गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ महिलांना हवा. तेही कोणत्याही दबावाशिवाय किंवा धमकीशिवाय. हिजाब पुरुषांना कसे फसवण्यापासून रोखते याबद्दल काही धार्मिक नेते बोलत होते हे ऐकून मला हसू आले.
Life and rummy follow the same rules, a joker in your hand is better than an ace up your sleeve. Follow stand-ups instead of mystics and ministers,the only price you pay is the admission ticket, or even better, is included in your Netflix subscription.https://t.co/8Fbb1KABzb pic.twitter.com/XMTcAv51fY
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) March 6, 2022
तसेच ती पुढे म्हणाली, 'या सर्व भाई लोकांनी आपले मत मांडणे थांबवावे आणि स्टँड-अप कॉमेडियनना बोलू द्यावे. फारच कमी पुरुष स्त्रीच्या डोक्याला इरोजेनस झोन मानतात. तुम्हाला अशी कुठलीही तारखेची रात्र आठवते का जिथे तुमचा नवरा किंवा तुमचा प्रियकर 'व्वा तुमचा डोके आज खूप हॉट दिसत आहे' असे म्हणत असेल? 'ओह थँक्स डार्लिंग, मी त्याला आकारात ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्या सौंदर्याला कुठलीही हानी होऊ देणार नाही.' असे मजेशीर शब्दात ट्विंकलने आपले परखड मत मांडले आहे.
यासोबतच ट्विंकलने रशिया-युक्रेन वादावर आपले मत मांडले आहे. तिने व्लादिमीर झेलेन्स्कीचे कौतुक केले. 'अखेर माजी गुप्तहेर पुतिनची रणनीती नाही, तर झेलिंस्कीच्या भूमिकेमुळे जग युक्रेनच्या बाजूने वळले.' असे ट्विंकलने पोस्टमध्ये म्हटले आहे.
हिजाब वाद काय आहे नेमके प्रकरण?
कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर या मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये सुरु झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.