मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /..तर ‘आनंद’मध्ये राजेश खन्ना ऐवजी धर्मेंद्र झळकले असते; काय होता तो किस्सा?

..तर ‘आनंद’मध्ये राजेश खन्ना ऐवजी धर्मेंद्र झळकले असते; काय होता तो किस्सा?

बॉलिवूडला पहिला सुपरस्टार मिळवून देणारा ‘आनंद’ (anand) हा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक मैलांचा दगड म्हणून ओळखला जातो. 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' राजेश खन्ना यांनी उच्चारलेला हा डायलॉग ‘आनंद’ या चित्रपटानं खरा करुन दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बॉलिवूडला पहिला सुपरस्टार मिळवून देणारा ‘आनंद’ (anand) हा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक मैलांचा दगड म्हणून ओळखला जातो. 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' राजेश खन्ना यांनी उच्चारलेला हा डायलॉग ‘आनंद’ या चित्रपटानं खरा करुन दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बॉलिवूडला पहिला सुपरस्टार मिळवून देणारा ‘आनंद’ (anand) हा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक मैलांचा दगड म्हणून ओळखला जातो. 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' राजेश खन्ना यांनी उच्चारलेला हा डायलॉग ‘आनंद’ या चित्रपटानं खरा करुन दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुढे वाचा ...

    मुंबई 12 मार्च: 'कहीं दूर जब दिन ढल जायें' हे गाणं आठवतंय का? अर्थात तुम्ही हे गाणं नक्कीच विसरले नसणार. 1971 साली प्रदर्शित झालेल्या या गाण्यानं रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान प्रस्थापित केलं आहे. परंतु खरा मुद्दा असा की हे गाणं ज्या चित्रपटातील आहे. त्या चित्रपटाला आज तब्बल 50 वर्ष पुर्ण झाली आहेत. बॉलिवूडला पहिला सुपरस्टार मिळवून देणारा ‘आनंद’ (Anand) हा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक मैलांचा दगड म्हणून ओळखला जातो. 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' राजेश खन्ना यांनी उच्चारलेला हा डायलॉग ‘आनंद’ या चित्रपटानं खरा करुन दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हृषीकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंदला 50 वर्षं झाली असली, तरी सिनेरसिकांच्या मते तो काळातील अभिजात (Timeless Classic) सिनेमा आहे.

    त्या वेळी सुपरस्टारपदाच्या दिशेने वाटचाल केलेला अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) ऊर्फ काका आणि नंतरच्या काळात अफाट लोकप्रियता मिळालेला अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'आनंद'मधल्या अभिनयाने आणि त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेरसिकांना भूरळ घातली आणि त्यांच्या हृदयात अढळपद मिळवलं. त्या सिनेमानं जगण्या-मरण्याचा उत्सव करण्याचा संदेश दिला. हसवलं आणि डोळ्यांत अश्रूही आणले. आज 50 वर्षं झाली, तरी 'आनंद'चं संगीत, संवाद, पात्रांची निवड या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट असल्याची जाणीव वारंवार होत राहते. अर्थात सिनेरसिकांचं हे मत असलं, तरी एका व्यक्तीला मात्र या सिनेमासाठी राजेश खन्नाची निवड होणं रुचलं नव्हतं. त्या व्यक्तीचं नाव आहे धर्मेंद्र (Dharmendra). खुद्द धर्मेंद्र यांनीच त्याबद्दलचा किस्सा एका कार्यक्रमात एकदा सांगितला होता.

    अवश्य पाहा - काऊंसिलर झाली अभिनेत्री? पाहा ‘अग्गबाई सूनबाई’ फेम शुभ्राचा प्रेरणादायी प्रवास

    धर्मेंद्र हे हृषीदा यांच्या लाडक्या अभिनेत्यांपैकी एक. हृषीदांच्या चुपके चुपके, गुड्डी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये धर्मेंद्र होते. 'आनंद'च्या दरम्यानच हृषीदांच्या 'सत्यकाम' चित्रपटात धर्मेंद्र काम करत होते. तो त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. मग नेमकं 'आनंद'च्या वेळी काय झालं होतं?

    2019 साली आपल्या नातवाच्या चित्रपटाचं कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी धर्मेंद्र आले होते. त्या वेळी त्यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला होता.

    'आम्ही बेंगळुरूहून विमानाने परत येत होतो. त्या वेळी विमानातच हृषीदांनी मला चित्रपटाची कथा सांगितली होती. 'आपण हे करू या,' 'आपण असं करू या' वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं होतं; पण नंतर मला समजलं, की हृषीदांनी राजेश खन्नाला मुख्य भूमिका देऊन सिनेमाचं काम सुरूही केलं आहे. त्या वेळी मी खूप निराश झालो होतो. त्या वेळी एक संपूर्ण रात्र हृषीदांना झोपू दिलं नव्हतं. मी तेव्हा मद्यपान केलं होतं. मी त्यांना सांगत होतो, की 'तुम्ही मला रोल देणार होतात, तुम्ही मला स्टोरी सांगितली होतीत, मग तो सिनेमा तुम्ही त्याला (राजेश खन्ना) का दिलात?' ते मला सांगत होते, 'धरम, आत्ता तू झोप जा. आपण सकाळी बोलू या.' एवढं बोलून ते फोन कट करायचे आणि मी पुन्हा तेच विचारायला त्यांना फोन करायचो,' अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी ती आठवण जागवली होती.

    नंतरच्या काळात हृषीदांच्या चुपके चुपके आणि गुड्डी या सिनेमांमध्ये धर्मेंद्र होते. 'चुपके चुपके'द्वारे हृषीदांनी धर्मेंद्र यांना विनोदी भूमिकेत पहिल्यांदाच सादर केलं होतं; मात्र 'आनंद' त्यांच्यासाठी बनलाच नव्हता.

    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Bollywood News