मुंबई, 4 जुलै- छोट्या पडद्यावर (Tv Show) ‘खतरों के खिलाडी’ हा शो खुपचं फेमस आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट असणाऱ्या या शोला दर्शकांकडून मोठी पसंती मिळते. त्यामुळे या शोच्या प्रत्येक सिझनची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा असते. लवकरच ‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) हा नवा सिझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कलाकारांनी नुकताच केपटाऊनमध्ये याचं शुटींगसुद्धा पूर्ण केलं आहे. आत्ता हळूहळू सेटवरचे नवनवीन व्हिडीओसुद्धा समोर येत आहेत. नुकताच एक नवा प्रोमो पाहायला मिळाला आहे. यामध्ये एक अनोख नातं फुलत असल्याचं सर्वांना दिसून आलं आहे.
कलर्स टीव्हीवरील बहुप्रतीक्षित शो ‘खतरों के खिलाडी 11’ ची सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे. टीव्हीवर प्रदर्शित होण्यापूर्वीच कलाकारांचे अनेक किस्से पाहायला मिळत आहेत. सर्व कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना केपटाऊन मधल्या अपडेटसुद्धा वेळोवेळी दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकरांना नव्या अंदाजात पाहायला चाहते खुपचं उत्सुक झाले आहेत. (हे वाचा: आमिरची पहिली पत्नी आज कशी दिसते?, वाचा ती सध्या काय करते ) नुकताच शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये एक नातं नव्याने खुलताना दिसून येत आहे. पण हे नातं प्रेमाचं नव्हे तर मैत्रीचं आहे. अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेता विशाल सिंहमध्ये हे नवं नात फुलल आहे. हे दोघेही सेटवर खुपचं धम्माल करत असल्याचं दिसून येत आहे. इतकचं नव्हे तर हे एकमेकांसोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखी केमिस्ट्री दाखवून सर्वांना पोटधरून हसायला भाग पाडत आहेत. (हे वाचा: VIDEO: शर्वरीने दिली गुड न्यूज!, ‘शुभमंगल ऑनलाईन’ मध्ये आनंदाचं वातावरण ) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘खतरोंके खिलाडी 11’ येत्या 17 जुलैपासून आपल्या भेटीला येणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची धम्माल पाहण्यासाठी चाहते खुपचं आतुर झाले आहेत. या सिझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी, निक्की तांबोळी, सना, अनुष्का सेन, अर्जुन बिजलानी, श्वेता तिवारी, विशाल सिंह,अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, वरुण सूद सारखे प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत.