मुंबई, 4 जुलै- ‘शुभमंगल ऑनलाईन’ (Shubhamangal Online) मालिकेत आनंदाचं वातावरण आहे. कारण शर्वरीने (Sharvari) नुकताच एक गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे शंतनू (Shantnu) खूपचं खुश झाला आहे. आणि शर्वरीची चेष्टासुद्धा करत आहे. मात्र ही गुड न्यूज तुम्ही समजत आहात ती नाहीय. पडला ना बुचकळ्यात? हो शर्वरीने गुड न्यूज दिली आहे. मात्र शर्वरी आई होणार आहे, असं काही नाहीय. मग ही न्यूज काय आहे चला तर मग जाणून घेऊया.
कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेमध्ये बऱ्याच दिवसांनंतर आत्ता सगळ काही सुरळीत होतं असल्याचं दिसत आहे. अनेक दिवसांनंतर मालिकेत आनंदाचे क्षण आले आहेत. नुकताच मालिकेत शर्वरी आणि शंतनूचं लग्न पार पडलं आहे. या दोघांनी पुन्हा एकदा नव्याने आपल्या संसाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रेक्षक खुपचं खुश आहेत. (हे वाचा: शिव ठाकरे-शिवानी बावकरमध्ये खुललं प्रेम; वाचा VIRAL फोटोमागचं सत्य ) अशातचं मालिकेत शर्वरीने एक गुड न्यूज दिली आहे. नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये शर्वरी शंतनूला गुड न्यूज असल्याचं सांगते. त्यामुळे शंतनू शर्वरीला मजेमजेत चिडवू लागतो. त्यामुळे शर्वरीसुद्धा अगदी लाजरीबुजरी होते. मात्र नंतर शर्वरी सांगते की आपण आत्ता वॉकरशिवाय चालू शकतो. कारण बरेच दिवस झाले मालिकेत शर्वरीच्या पायाला दुखापत झाल्याचं दाखवलं जात होतं.मात्र आत्ता शर्वरीने गुड न्यूज देत सांगितल आहे. की ती आत्ता वॉकरशिवाय आपली पावलं टाकू शकते. त्यामुळे शंतनूसुद्धा अगदी आनंदी झाला आहे. (हे वाचा: आमिरची पहिली पत्नी आज कशी दिसते?, वाचा ती सध्या काय करते? ) तसेच गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत शंतनू जॉबलेस झाल्यामुळे सर्वचजण चिंतेत होते. शंतनूसुद्धा खुपचं तणावाखाली असल्याचं दिसत होता. मात्र या प्रोमोमध्ये शंतनूसुद्ध जॉब इंटरव्युव्हसाठी जाणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच शंतनूने जॉबबद्दलही गुड न्यूज मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.