मुंबई, 4 जुलै- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता आमिर खानने(Aamir Khan) काल आपली दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेत सर्वांनाचं धक्का दिला आहे. आमिरने किरणसोबत 15 वर्षांचं हा संसार मोडला आहे. इतकचं नव्हे तर याआधी आमिरने आपली पहिली पत्नी रीना दत्तासोबतसुद्धा 16 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला होता. आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटनंतर पहिली पत्नी रीना दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चला तर मग पाहूया रीना दत्ता(Reena Datta) सध्या काय करते, आणि कशी आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. मात्र त्याची पर्सनल लाईफ इतकी परफेक्ट नाहीय. कारण आमिरचे या 30 वर्षात 2 संसार तुटले आहेत. आमिर खानने काल आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याची पहिली पत्नीसुद्धा चर्चेत आली आहे. आमिरच्या सर्व चाहत्यांना आत्ता उत्सुकता लागली आहे, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता सध्या काय करते? किंवा ती आत्ता कशी दिसते? E 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रीना नोकरी करत होती. तसेच ती आपल्या दोन्ही मुलांच्या सांभाळाकडे पूर्णपणे लक्ष देत होती. घटस्फोट घेतल्यानंतरसुद्धा आमिर खान आणि रीना दत्तामध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. हे दोघेही एकमेकांच्या आनंदाच्या क्षणी उपस्थित असत. तर दुखातही एकमेकांना साथ देत. आमिरची दुसरी पत्नी किरण रावचेसुद्धा रीनासोबतअगदी मैत्रीपूर्ण संबंध होते. शेवट रीना दत्ताला 2019 मध्ये पाहण्यात आलं होतं. त्यावेळी ती तिचा वाढदिवस साजरा करताना दिसून आली होती. यावेळी आमिर खान आणि किरण रावसुद्धा रीनासोबत उपस्थित होते. (हे वाचा:
शिव ठाकरे-शिवानी बावकरमध्ये खुललं प्रेम; वाचा VIRAL फोटोमागचं सत्य
) मात्र त्यानंतर रीना अजूनही पाहण्यात आलेली नाहीय. इतकचं नव्हे तर गेल्या 5 वर्षांपासून रीनाचा एकही फोटो पाहायला मिळाला नाही. मुलगा जुनैद आणि मुलगी आयरानेसुद्धा आई रीना दत्ताचा कोणताच फोटो शेयर केलेला नाहीय. आमिर आणि रीनाचा मुलगा जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.