मुंबई 5 मे: कोरोनाचा प्रकोप (corona virus) संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. अनेकांनी या काळात आपल्या प्रियजननांना कोरोनामुळे गमावलं आहे. अनेकजन जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटीही (Bollywood celebrity) मदतीसाठी पुढे येत आहेत. यात अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा देखील नेहमीच लोकांची मदत करताना दिसतो. आता सलमानने कोरोनामुळे वडिल गमालवलेल्या एका मुलाची जबाबदारी उचलली आहे.
कर्नाटकमधील एक सायन्स स्टुडंट असणाऱ्या मुलाला सलमानने मदत केली आहे. काही दिवसापूर्वीचं या मुलाच्या वडिलांच कोरोनाने निधन झालं होतं. त्यामुळे घराचा आधारचं संपला होता. पण ही गोष्ट सलमानला समजल्यानंतर त्याने या मुलाला मदत करण्याचं ठरवलं आहे. युवा सेनेचा नेता राहूल एन कनाल याने ट्वीट करत ही माहिती दिली.
Thank you @upalakbr999 mam @mid_day for the feature this movement totally goes out to each and everyone from one big family, Being Human Fan club and our being human @BeingSalmanKhan bhai for empowering us and inspiring each fan to reach out every being...One Big Team 🙏 pic.twitter.com/6fjCiZvWzQ
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) May 4, 2021
राहूनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे, सलमानने 18 वर्षीय सायन्स स्टुडंट मुलाची मदत केली. तर त्याच्या इतरही गरजा पूर्ण केल्या, ज्याची त्याला त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी मदत होईल.
धक्कादायक! कोरोनामुळे आणखी एका मराठी कलाकाराचा बळी, 'बापमाणूस' फेम अभिनेत्रीचं निधन
राहूल एन कनाल सध्या सलमान खान सोबत मिळून त्याच्या सामाजिक कार्यात मदत करत आहे. राहूलने शेअर केलेल्या वृत्तात लिहीलं आहे, की सलमान त्याच्या चाहत्यांसह इतर सर्व लोकांची मदत करण्यासाठी सज्ज आहे. त्याने आपल्या टीमला सांगितल आहे, की जे कोणी आपल्याकडे मदत मागण्यासाठी येतील त्यांना निराश करू नये, जमेल तशी सर्व प्रकारची मदत करावी.
काही दिवसांपूर्वीच सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात त्याने फ्रंट लाइन वर्कर्ससाठी जेवणाची सोय केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Corona, Covid-19, Entertainment, Salman khan