मुंबई, 20 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Lock Upp) सध्या एकता कपूरचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ होस्ट करताना दिसत आहे. शोमध्ये कंगना अनेकदा स्पर्धकांची शाळा घेताना दिसते. पण अलीकडे या शोमध्ये एक स्पर्धक कंगनाशीच भिडल्याचं पाहायला मिळालं आहे. इतकेच नाही तर या स्पर्धकाने कंगनाला खूप काही ऐकवले देखील. ती असं देखील म्हणाली की तिचं तोंड बंद करू शकत नाही. ही लॉक अप स्पर्धक दुसरी कोणी नसून पायल रोहतगी आहे. पायलने अलीकडच्या एपिसोड्समध्ये कंगनाशी पंगा घेतला होता. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडओवर विशेष कमेंट्स येताना दिसत आहेत. अलीकडच्या एपिसोड्समध्ये पायल रोहतगी कंगनाशी भांडताना पाहायला मिळाली. तिने कंटेस्टंटला फेव्हर करण्याचा आरोप केला होता. दरम्यान असं असलं तरी कंगना ती शेवटी कंगनाच, तिने पायलला उत्तर देत दाखवलं की हा शो कुणाचा आहे आणि याठिकाणी कुणाची चलती आहे. कंगनाने देखील पायलला खूप सुनावल्याचं या एपिसोडमध्ये पाहायला मिळतं आहे. हे वाचा- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन ‘या’ दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट पायल कंगनाला म्हणते- ‘तुम्ही माझे तोंड बंद करू शकत नाही. मला माहित आहे की करणवीरने एकता कपूरचा नागिन शो केला आहे बरोबर? ठीक आहे मग आता मी काय करू? मला समजले. मी पण प्रयत्न करू का? प्रत्येकाला सोयीस्कर व्हावे यासाठी मी येथे आउट ऑफ द बॉक्स जात आहे. पण, टीमच्या फायद्यासाठी मी माझा स्वतःची मन:शांती खराब केली. मी आता हे करू शकत नाही.’ हे वाचा- रेमो डिसुझाने फेडलं स्पर्धकाचं कर्ज, 8 वर्षांच्या चिमुरड्याला केली मोठी मदत पायल कंगनाला म्हणते की, ‘कंगना तुम्ही सांगता ते सर्व चांगलं आणि मी सांगते ते सर्व वाईट. कुणीही येईल टपली मारून जाईल हे मला पटणार नाही. कंगना रणौत मी तुमच्याशी भांडायला आलेली नाही. पण माझ्यावर कुणी हल्ला केला तर मी स्वत:ला डिफेंड नक्की करेन.’ पायलचा असा अवतार बघून कंगना देखील भडकते.
पंगा क्वीन कंगना रणौत तिला सुनावते की, ‘तुला काय वाटतं हा तुझा शो आहे, हा तुझा शो नाही आहे. तू लीडरचा झेंडा घेऊन फिरत असते की मी लीडर आहे, फक्त मीच बोलणार. खरा लीडर असं करत नाही आणि करायला देखील नाही पाहिजे.’ आधीच्या एपिसोडमध्ये करणवीर बोहराला त्याची पत्नी टीजे आणि मुलींसोबत होळीच्या निमित्ताने वेळ घालवण्याची संधी मिळाली. याबाबत पायलने कंगनाकडे तक्रार केली आहे.