मुंबई, 01 मे: ब्रेस्ट कॅन्सरशी (Breast Cancer) झुंज देत असलेली अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal Cancer Fight) सतत तिच्या चाहत्यांना आणि सर्वसामान्यांना तिच्या उत्साहाने प्रभावित करते आहे. एवढं मोठं संकट आलेलं असूनही या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य अनेकांना प्रोत्साहित करत आहे. छवीवर गेल्या मंगळवारी कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती आणि ती अजूनही रुग्णालयातच आहे, पण ती स्वत:ला पेशंट समजत नाही आणि कुणालाही जाणवू देत नाही. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरही तिने इन्स्टाग्राम हँडलवर दीर्घ पोस्ट शेअर केल्या आहेत. तिने काही रील्स देखील पोस्ट केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होता. आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सलॉनमध्ये स्वत:साठी वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती हॉस्पिटलच्या सलॉनमध्ये जाताना दिसत आहे. यादरम्यान ती थोडी नर्व्हस देखील दिसली, पण तरीही ती त्याठिकाणी पोहोचली. तिथे ती तिचे केस चांगले धुते आणि म्हणते, ‘शॅम्पू केल्यानंतर मला इतका आनंद होईल असे कधीच वाटले नव्हते’. पुढील व्हिडीओमध्ये ती ब्लो ड्राय देखील करताना दिसत आहे. यामध्येही तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी होत नाही आहे. या व्हिडीओसह तिने एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे.
छवीने लिहिले की, ‘काही मोठ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद देऊन जातात. मला स्वतःचा इतका अभिमान वाटतो की मी लिफ्टमध्ये जाऊन सलॉनमध्ये बसले, केस धुतले आणि ब्लो ड्राय केले. आज मी आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक, सर्वात धीमा पण सर्वात फ्रेश शॉवर घेतला. एवढ्या प्रेम आणि प्रार्थनेबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. बोगद्याच्या शेवटी नेहमी प्रकाश असतो.’ यासोबतच छवीने #cancerfighter ही लिहिले. हे वाचा- ‘मी तुझ्याशिवाय…’, विराट कोहलीच्या रोमँटिक Birthday पोस्टवर अनुष्का शर्माची Cheesy कमेंट छवीची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आणि मित्रमंडळी खूप खूश दिसत आहेत. हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्यावर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ‘तू खूप सुंदर आहेस’, ‘तू शूर आणि सुपरकुल आहेस’, ‘खूप पॉझिटिव्ह आहेस’ अशा अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर आल्या आहेत.