मुंबई, 01 मे: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Happy Birthday Anushka Sharma) आज 1 मे रोजी 34वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत, काही चांगल्या प्रोजेक्ट्सची निर्मितीही तिने केली आहे. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे कपल (Virat Kohli and Anushka Sharma) त्यांच्या अनेक चाहत्यांचे फेव्हरिट आहे. या दोघांचे फोटोज अनेकदा व्हायरल होत असतात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास फोटो शेअर करत असतात. क्रिकेटपटू विराट कोहली याने अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या मित्रपरिवारासह पत्नीचा वाढदिवस साजरा केला, यावेळचे फोटो विराटने पोस्ट केले आहे. यावेळी विराटने असं म्हटलं आहे की, ‘देवाचा आभारी आहे की तुझा जन्म झाला. तुझ्याशिवाय मी काय करू हे मला माहित नाही. तू खरंच आतून-बाहेरुन सुंदर आहेस. गोड लोकांसोबत मस्त दुपार घालवली.’ विराटच्या या रोमँटिक पोस्टवर अनुष्कानेही अगदी ‘Cheesy’ रिप्लाय दिला आहे. तिने अशी कमेंट केली आहे की, ‘माझे शब्द आणि माझं हृदय चोरलं आहेस’. तिने या उत्तराला स्वत:च Cheesy म्हटलं आहे.
विराट प्रमाणेच अनुष्काने देखील तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, ‘मला आनंदी, अधिक प्रेमळ, अधिक समजुतदार वाटत आहे, स्वत:ला कमी गांभीर्याने घेत आहे, अधिक ऐकत आहे, छोट्याशा गोष्टीत आनंद शोधतेय, let-go चांगल्या प्रकारे करता येत आहे, स्वत:ला आणि दुसऱ्यांना आणि परिस्थितीला अधिक स्विकारते आहे, अधिक सुंदर वाटते आहे, भावना सहज व्यक्त करते आहे, माझ्या मताला इतरांपेक्षा अधिक महत्त्व देत आहे… हे मोठं होणं छान चाललं आहे. सर्वांनी हे अनुभवायला हवं. सर्व शुभेच्छांसाठी आणि तुम्ही जे प्रेम दिलात त्यासाठी धन्यवाद. ता.क.- मी माझ्या बर्थडे केकचा सर्वात मोठा पीस खाल्ला, जे मी करायलाच हवे होते.’
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या या पोस्टवर आणि विराट कोहलीच्याही या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजूनही चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याने जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाचे स्वागत केले.