HBD: बेस्ट 'फीमेल विलन' पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री आहे काजोल!
काजोलला भारत सरकारने 'पद्मश्री' देवून सन्मानित केलं आहे. काजोलने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. मात्र तिची जोडी सर्वात जास्त शाहरुख खानसोबत पसंत केली जाते.
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि न्टखट अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखलं जातं. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाची ती मुलगी आहे. काजोलचं जन्म 5 ऑगस्ट 1974मध्ये झाला होता.
2/ 10
नेहमीचं हसतमुख असणाऱ्या काजोलने 19९२ मध्ये आलेल्या 'बेखुदी' चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तिच्या अभिनयचं कौतुक झालं. मात्र तिला खरी ओळख मिळाली 'बाजीगर'या चित्रपटातून. यामध्ये शाहरुखसोबत तिची जोडी प्रचंड पसंत केली गेली.
3/ 10
काजोल आणि शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ळे जायेंगे' या चित्रपटाने तर सुपरहिट होतं अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटासाठी काजोलला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मेफेयर पुरस्कार मिळाला होता.
4/ 10
काजोलला तब्बल 6 वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. कुछ कुछ होता है, कभी ख़ुशी कभी गम, फना या चित्रपटांचा यामध्ये समावेश होतो.
5/ 10
काजोलने आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. मुख्य अभिनेत्री असणाऱ्या काजोलने राजीव राय यांच्या 'गुप्त' चित्रपटात मात्र खलनायिकेची भूमिका साकारायचं धाडस केलं होतं..
6/ 10
आणि काजोलने विलनची भूमिका साकारात इतिहास घडवला कारण या चित्रपटासाठी तिला बेस्ट फीमेल विलनचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. आणि असा पुरस्कार मिळवणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती.
7/ 10
काजोलला भारत सरकारने 'पद्मश्री' देवून सन्मानित केलं आहे. काजोलने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. मात्र तिची जोडी सर्वात जास्त शाहरुख खानसोबत पसंत केली जाते.
8/ 10
काजोलने अभिनेता अजय देवगनसोबत लग्न केलं आहे.
9/ 10
काजोल आणि न्यासाला न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे.
10/ 10
सध्या काजोल आपल्या कुटुंबावर आणि मुलांवर जास्त लक्ष केंद्रित करते.