मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे मागचा काही काळ बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र आता ती अचनाक चर्चेत आली आहे ती तिच्या रिलेशनशिपमुळे...
2/ 12
मुग्धा गोडसे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या वयातील फरकाबद्दल पहिल्यांदाच बोलली.
3/ 12
मुग्धा स्वतःपेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेला अभिनेता राहुल देवला मागच्या काही वर्षांपासून डेट करत आहे.
4/ 12
राहुल देव हा बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता असून तो विवाहित आहे. एवढंच नाही तर तो एका मुलाचा बापही आहे.
5/ 12
राहुल देवनं पत्नीच्या निधनानंतर मुलाचा सांभाळ एकट्यानं केला असून 2015 पासून मुग्धा आणि राहुल एकमेकांना डेट करत आहेत.
6/ 12
मुग्धानं फॅशन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं या सिनेमासाठी मुग्धाला 'बेस्ट डेब्यू' अवॉर्ड मिळाला होता.
7/ 12
राहुल देवसोबतच्या नात्याबद्दल बोलतना मुग्धा म्हणते, माझ्या आणि राहुलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे या नात्याच्या सुरुवातील मला थोडी भीती नक्कीच वाटली होती.
8/ 12
मुग्धा पुढे म्हणाली, सुरुवातीला हे नातं टिकेल की नाही बद्दल मला शंका होती मात्र जेव्हा माझ्या आई-वडीलांकडे पाहिलं तेव्हा मला हा वयातील फरक फारसा जाणवला नाही कारण माझ्या आई-वडीलांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे.
9/ 12
मुग्धासोबतच्या आपल्या नात्याबद्दल राहुल देव सांगतो, "मुग्धा आणि मी रिलेशनशिपमध्ये आहे. माझं आणि माझ्या स्वर्गवासी पत्नीच्या कुटुंबालाही याची माहिती आहे.
10/ 12
राहुल पुढे सांगतो, 'आम्ही जेव्हा दिल्लीत असतो तेव्हा ती माझ्या कुटुंबासोबत राहते. माझ्या मुलालाही आम्ही एकमेकांना डेटिंग करत आहोत हे माहिती आहे.'
11/ 12
2009 मध्ये राहुल देवच्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर त्यानं आपल्या मुलाला एकट्यानं सांभाळलं आहे.
12/ 12
एका मित्राच्या लग्नात राहुल आणि मुग्धाची भेट झाली होती. त्यानंतर दोघांचंही आयुष्य बदललं. सुरुवातीला या दोघांमध्ये फक्त मैत्री होती. मात्र नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं आणि मागच्या 5 वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत.