मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बापरे! डोक्यावर टक्कल, चेहऱ्यावर जखमा; ऑनस्क्रीन सीता Debina Bonnerjee ची भयंकर अवस्था पाहून चाहते शॉक

बापरे! डोक्यावर टक्कल, चेहऱ्यावर जखमा; ऑनस्क्रीन सीता Debina Bonnerjee ची भयंकर अवस्था पाहून चाहते शॉक

टीव्हीवर रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री देबिना बॅनर्जीला (Debina Bonnerjee) नेमकं झालं तरी काय?

टीव्हीवर रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री देबिना बॅनर्जीला (Debina Bonnerjee) नेमकं झालं तरी काय?

टीव्हीवर रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री देबिना बॅनर्जीला (Debina Bonnerjee) नेमकं झालं तरी काय?

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 22 ऑक्टोबर : रामायणातील दोन कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. अशात आता रामायणातील ऑनस्क्रीन राम-सीतेचा (Ramayana seeta) व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि अभिनेता गुरमीत चौधरीला पाहून सर्वांना धक्का बसला आहे (Debina Bonnerjee bald look). या कपलला नेमकं काय झालं आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी भयंकर अवस्थेमुळे चर्चेत आले आहेत. देबिनाच्या डोक्यावर टक्कल पडलं आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमाही दिसत आहे. तर गुरमी आंधळा झाला आहे. देबिनाची अवस्था पाहून तिला काय झालं आहे, तिला कोणता आजार झाला आहे का, असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान याचं कारण आता समोर आलं आहे.
देबिना आणि गुरमीतला काहीही झालेलं नाही. त्यांच्या या अवताराचं कारण म्हणजे शॉर्ट फिल्म आहे. दोघांनीही शुभो बिजोया नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी ही शॉर्ट फिल्म आहे.  ही शॉर्ट फिल्म एक लव्ह स्टोरी आहे. एका अपघातानंतर एका कपलचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. गुरमीत आंधळा दाखवण्यात आला आहे, तर देबिनाला आजार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे वाचा - आर्यन खानने अनन्या पांडेकडून केली गांजाची मागणी! अखेर अभिनेत्रीचा मोठा खुलासा आता या भूमिकेसाठी खरंच देबिनाने टक्कल केलं आहे का? तर नाही देबिनाने आपले केस काढलेले नाहीत. तर प्रोस्थेटिक मेकअपने हे टक्कल दाखवण्यात आलं आहे. देबिना सांगते, एक अभिनेत्री म्हणून तासन्तास मेकअपवाल्या खुर्चीत बसणं सवयीचं झालं आहे. पण बिजोयाची भूमिका वेगळी होती. याच्या शेवटच्या रिझल्टने मला रडू कोसळलं. कारण हे खूप भावुक होतं. अशा आजारांनी पीडित व्यक्तींच्या वेदना मी अनुभवल्या. हा फक्त एक मेकअप आणि गिअर होता पण माझ्या मेंदू आणि शरीरासाठी खूप आव्हानात्मक होतं. जे लोक प्रत्यक्षात या परिस्थितीतून जातात त्यांच्यासाठी हे किती कठीण असेल याचा विचारही मी नाही करू शकतं. आपलं आयुष्य खूप नाजूक आहे आणि त्याला हलक्यात घेऊ नये, हे मला यातून कळलं. हे वाचा - तुमच्यासाठी कायपण!'त्या'सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; 'सुख म्हणजे नक्की काय असतं तब्बल 11 वर्षांनी देबिना आणि गुरमीत एकत्र काम करणार आहेत. 2008 साली रामायणात ही जोडी राम-सीतेच्या भूमिकेत दिसली होती. ऑनस्क्रिनच नव्हे तर ऑफस्क्रिनही या कपलची केमिस्ट्री चांगली आहे.
First published:

Tags: Entertainment, Film, Short film, Tv actress

पुढील बातम्या