Home /News /entertainment /

आर्यन खानने अनन्या पांडेकडून केली गांजाची मागणी! अखेर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आर्यन खानने अनन्या पांडेकडून केली गांजाची मागणी! अखेर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आर्यन खान प्रमाणेच अनन्या पांडेही अडकणार NCB च्या जाळ्यात?

    मुंबई, 22 ऑक्टोबर : ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) सातत्याने कारवाई करीत आहे आणि आता या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिचंही नाव समोर आलं आहे. काल पहिल्यांदा अनन्या हिची चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ऑर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. आता अनन्या पांडे आणि आर्यनमध्ये झालेली बातचीत समोर आली आहे. ज्यावर अनन्याने स्पष्टीकरण दिलं आहे. (Aryan Khan demands Ganja from Ananya Pandey Finally the big revelation of the actress) आर्यन आणि अनन्या दरम्यान काय बोलणं झालं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी (NCB) ज्या व्हाट्सअॅप चॅट्सचा हवाला देऊन अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चौकशी करीत आहे, ते आर्यन खान (Aryan Khan) आणि अनन्या पांडे यांच्यामधील आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलत होते. आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतो- If Ganja can be arrange. यावर अनन्या पांडे म्हणते - She will arrange चॅटवर अनन्या पांडेंच स्पष्टीकरण एनसीबीच्या (NCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या पांडे (Ananya Panday) सोबत याबाबत गुरुवारी चौकशी करण्यात आली. त्यावेळी अनन्या म्हणाली की, आर्यन खानसोबत ती मस्करी करीत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवायही त्यांच्याजवळ असे अनेक चॅट्स आहेत, ज्यात दोघे विविध ठिकाणी नारकोटिक सब्सटेंस (Narcotic Substances) बद्दल बोलत होते. हे ही वाचा-आज काचेच्या आडून आर्यनने घेतली बापाची भेट; प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा अनन्या पांडेच्या (Ananya Panday) घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) बुधवारी छापेमारी केली आणि तिला चौकशीसाठी बोलावलं. तिला गुरुवारी एनसीबीच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली. आता गेल्या रात्री एनसीबीने मुंबईच्या एक संशयास्पद ड्रग तस्करला ताब्यात घेतलं. आता  एनसीबी द्वारा आज अनन्या आणि पेडलरसंबंधित क्रॉस क्वेश्चनची शक्यता आहे. कारण हा तस्कर आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यामधील एक लिंक म्हणून पाहिलं जात आहे. .
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aryan khan, Drugs, Mumbai, NCB, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या