• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेता शुभंकरच्या खास Birthday चा VIDEO VIRAL ; पाहून तुम्हीही कराल कौतुक

अभिनेता शुभंकरच्या खास Birthday चा VIDEO VIRAL ; पाहून तुम्हीही कराल कौतुक

मराठमोळ अभिनेता शुभंकर तावडेने ( shubhankar tawde) विशेष मुलांसोबत वाढदिवस ( shubhankar tawde birthday)साजरा करत त्यांने चांगला संदेश दिला आहे.

 • Share this:
  मुंबई. 27 ऑक्टोबर : मराठमोळ अभिनेता शुभंकर तावडेचा ( shubhankar tawde)26 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. प्रत्येक जण वाढदिवस आपल्या पद्धतीने साजरा करत असतो. मात्र या कोरोनाच्या काळात वाढदिवस कसा साजरा करावा ह्याचे उत्तम उदाहरण त्याने दिलं आहे. विशेष मुलांसोबत वाढदिवस ( shubhankar tawde birthday)साजरा करत त्यांने चांगला संदेश दिला आहे. मंगळवारी मुंबईतल्या उमंग चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह शुभंकरने आपला वाढदिवस साजरा केला. शुभंकरने  याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. शुंभकरने त्याच्या इन्स्टावर त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या मुलांसोबत केक कापला. त्यांना भेटवस्तू दिल्या. आणि एक छोटेखानी गेटटुगेदर पार्टी साजरी करून मुलांसह आनंद साजरा केला. या पर्टीत शुंभकर आणि मुलं मिसळुन गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. मुलांनी शुंभकरसोबत मस्त डान्स केला.
  शुभंकर याविषयी म्हणाली की, कोरोनामुळे गेल्या एका वर्षात घरात बसून आपल्या सगळ्यांच्या शारिरीक-मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम झाला. मग ह्या विशेष मुलांवर ह्या वातावरणाचा कसा परिणाम झाला असेल? त्यामुळेच आता बंधनं शिथिल झाली आहेत.  त्यांची शाळा उघडताना त्यांना आनंदित करावे, या विचाराने मी माझ्या वाढदिवसाचंनिमित्त साधलं.  त्यांच्यासाठी एका र्टी आयोजित केली. वाचा :BB मराठीच्या घरातील दादूस याचं नवं गाणं ; “एकच वादा, आमचा विशाल दादा" मोकळ्या आभाळात उडणा-या पक्षाचा आनंद त्यांच्या चेह-यावर होता. हा निरागस आनंद पाहून मी ठरवलं की, वर्षातून एकदा तरी त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांच्याकडून खूप सकारात्मक उर्जा घेऊन आता मी कामाला लागणार असल्याचे देखील यावेळी शुंभकरने सांगितलं. वाचा :VIDEO:रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी'मधून रणवीरचा रोल कट करण्याची दिली धमकी; वाचा.... शुभंकर तावडेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता त्याचे ‘8 दोन 75’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फोर ब्लाइंड मेन’ हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: