टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटीलेटरवर, शूटिंग दरम्यान सेटवरच कोसळली

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटीलेटरवर, शूटिंग दरम्यान सेटवरच कोसळली

या टीव्ही अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान अचानक तब्येत बिघडल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूड कलाकार असो वा मग टीव्ही स्टार अनेकदा बीझी शूटिंग शेड्यूलमुळे सलग अनेक तास शूटिंग करतात. पण अनेकदा असं करण त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकारही घडले आहेत. काही दिवसांपूर्वी सलग अनेक तास शूट केल्यानं अभिनेता वरुण धवनला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. त्यानंतर आता एका टीव्ही अभिनेत्री सोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठ शूटिंग दरम्यान अत्यावस्थ झाल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

गहना वशिष्ठ 21 नोव्हेंबरला मुंबई येथील मढ आयर्लंडवर एका वेबसीरिजचं शूटिंग करत होती. कोणत्याही तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय गहना मागचे 48 तास सलग शूट करत होती. दरम्यानच्या काळात तिनं फक्त एनर्जी ड्रिंक घेतलं होतं. ज्यामुळे तिला एग्जर्शन झालं आणि ती सेटवर बेशुद्ध झाली. गहनाला मधुमेहाचा त्रास असून तिची शुगर लेव्हल खूप जास्त आहे आणि बीपी लेव्हल खूपच कमी आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये ती प्राथमिक उपचारांनी ती कसलाच प्रतिसाद देत नव्हती आणि तिला श्वास घेताना सुद्धा त्रास होत होता. त्यामुळे आता तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता खान देणार दुसऱ्या बाळाला जन्म? वाचा काय आहे सत्य

गहना वशिष्ठ स्टार प्लसवरील मालिका ‘बहने’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिनं 2012 मध्ये मिस एशिया बिकिनी कॉन्टेस्ट जिंकली होती. मागच्या 5 वर्षांत गहनानं 30 पेक्षा जास्त साउथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या ‘गंदी बात’ आणि ‘उल्लू एप’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

इंजिनियरिंग सोडून गाठलं होतं बॉलिवूड, आता अक्षय कुमारवर भारी पडतोय हा अभिनेता

वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

======================================================================

 

First published: November 22, 2019, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading