2 महिन्यांनी पुन्हा उघडणार शॉपिंग मॉल्स; मात्र अनिवार्य असतील हे नियम

2 महिन्यांनी पुन्हा उघडणार शॉपिंग मॉल्स; मात्र अनिवार्य असतील हे नियम

गेल्या काही दिवसात हळूहळू अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या असल्या तरी परिस्थिती ही पूर्वीसारखी नसेल. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जून :  अनलॉक 1 अंतर्गत 8 जूनपासून शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, परंतु शॉपिंग मॉलमधून फिरुन खरेदी करणे यापुढे सहज असणार नाही. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच सावधगिरी बाळगल्या आहेत. मॉलमधील प्रत्येक ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्याने हे नियम पाळणे आवश्यक असतील. मॉल मालकांनी सांगितल्यानुसार पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांना मॉल सुरक्षित असल्याची खात्री व्हायला हवी यासाठी प्रयत्न सुरू आहे.

हे नियम पाळणे बंधनकारक

>> कोरोना रोखण्यासह शॉपिंग सुरक्षित कसे करता येईल, यासाठी एक एसओपी तयार करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत प्रत्येक ग्राहक आणि दुकानदारास आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे आवश्यक आहे.

>> मॉल्समध्ये प्रवेश करताना मास्क, स्वच्छता आणि थर्मल स्क्रीनिंग देखील अनिवार्य केले आहे.

>> एस्केलेटरवर एका वेळी 3 पेक्षा जास्त लोक नसतील आणि 2 लोकांमध्ये 3 पायऱ्यांचे अंतर असेल.

>> मेक-अप उत्पादने, शूज आणि परफ्युम यासारख्या गोष्टींच्या ट्रायलवर पूर्णपणे बंदी घातली जाईल.

>> एकावेळी शोरूमच्या आत ग्राहकांची संख्या 5 पेक्षा जास्त असणार नाही.

>> त्याशिवाय मॉल परिसर, वॉशरूम, फूड कोर्ट यासारख्या जागेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाईल.

मॉल मालकांचे म्हणणे आहे की, पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांना मॉल्समध्ये खरेदी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास करून द्यावयाचा आहे. इन्फिनिटी मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश कुमार म्हणाले की, ग्राहक मॉलमध्ये आल्यानंतर त्यांना सुरक्षित वाटायला हवे. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक पाऊल उचलले जात आहे. आम्ही पोस्टर्सचा आधार घेऊन ग्राहकांना काय करावे आणि काय करू नये हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे वाचा-पुढील दोन तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

First published: June 3, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या