• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sonam Kapoor ने कपडे घालताना मागितली पती आनंदकडे मदत; मदत करायची सोडून त्याने बनवला VIDEO

Sonam Kapoor ने कपडे घालताना मागितली पती आनंदकडे मदत; मदत करायची सोडून त्याने बनवला VIDEO

सोनम कपूर एक लांबलचक कोट घालत आहे, हा कोट घालत असताना आनंदने सोनमचा व्हिडिओ केला आहे. यावेळी सोनम कपडे घालत असताना पतीकडे मदत मागत आहे. मात्र आनंद सोनमचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्थ आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 सप्टेंबर ; बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) तिच्या फॅशन सेन्ससाठी (Fashion Sense) जितकी ओळखली जाते तितकीच ती तिच्या अभिनयासाठीही ओळखली जाते. सोनम कपूर अनेकदा तिच्या इन्स्टावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. यासोबतच तिचा पती आनंद आहुजा (Husband Anand Ahuja) देखील सोनमशी संबंधित काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच आनंदने त्याच्या अधिकृत इन्स्टावर सोनमचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यावर सोनमचे चाहते धडाधड लाईक आणि कमेंट करत आहेत. सोनम कपूर एक लांबलचक कोट घालत आहे, हा कोट घालत असताना आनंदने सोनमचा व्हिडिओ  केला आहे. या व्हिडिओत सोनम कोट घालण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे मात्र तिला तो नीट घालता येईना.  या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सोनमला कोट घालण्यात अडचण येत आहे. यावेळी ती पती आनंदकडे मदत मागत आहे. ..मला मदत कर ...आय एम स्टक (I am stuck) मी अडकली आहे...असं काही म्हणत आहे. पण आनंद मदतीसाठी पुढे येत नाही, तो फक्त सोनमचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहे. पतीकडून मदत न मिळाल्यावर, सोनम प्रेमाने म्हणते, रिडिक्यूलस (Ridiculous)’, यावर आनंद देखील गंमतीने ‘व्हाट रिडिक्यूलस (What Rediculous)’ असं म्हणताना दिसत आहे.आनंदचे वागणं पाहून सोनम म्हणतेय की, मला कपडे घालण्यात अडचण येत आहे आणि तू माझा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेस. इथे थंडी नाही, तू नाटक करत आहेस..असं आनंद सोनमला म्हणत आहे. वाचा :'आई कुठे काय करते' मालिका बंद करा' ; 'या' कारणासाठी मालिका होतेय TROLL सोनम आणि आनंदच्या प्रेमळ संवादवर चाहते मंडळी देखील कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहे. यासोबतच आनंद आहुजाने आपल्या इन्स्टा स्टोरीला देखील हा व्हिडिओ देखील टाकला आहे. यामध्ये आनंद सोनमच्या सुंदर केसांची प्रशंसा करताना दिसत आहे. नुकतेच सोनम कपूरने तिचे केस कापले आहेत, आणि तिला हा नवीन हेअर कट खूपच सुंदर देखील दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by anand s ahuja (@anandahuja)

  लग्नानंतर सोनम कपूर तिच्या पतीसोबत लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी तिथे एक नवीन घर घेतले आहे, ज्याचे इंटीरियर स्वतः सोनमने डिझाईन केले आहे. अलीकडेच सोनमची धाकटी बहीण रिया हिचे देखील लग्न झाले. या लग्नासाठी आनंद आणि सोनम भारतात आले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: