मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shahnaz-Asim वादात 'या' टीव्ही अभिनेत्याची उडी; असीमची केली कानउघडणी

Shahnaz-Asim वादात 'या' टीव्ही अभिनेत्याची उडी; असीमची केली कानउघडणी

मॉडेल असीम रियाझ (Asim Riaz) आणि शहनाज गिल (Shahnaz Gill) या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या वादात आता टीव्हीच्या एका बड्या अभिनेत्याने उडी घेतली आहे.

मॉडेल असीम रियाझ (Asim Riaz) आणि शहनाज गिल (Shahnaz Gill) या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या वादात आता टीव्हीच्या एका बड्या अभिनेत्याने उडी घेतली आहे.

मॉडेल असीम रियाझ (Asim Riaz) आणि शहनाज गिल (Shahnaz Gill) या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या वादात आता टीव्हीच्या एका बड्या अभिनेत्याने उडी घेतली आहे.

  मुंबई, 28 डिसेंबर: मॉडेल असीम रियाझ (Asim Riaz) आणि शहनाज गिल (Shahnaz Gill) या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. याला कारण म्हणजे, असीमने ट्विटरच्या माध्यमातून शहनाजवर जहरी टीका (Asim Trolls Shahnaz) केल्याचे बोलले जात आहे. सोमवारी केलेल्या या ट्विटनंतर कित्येक सेलिब्रिटी असीमची, तर कित्येक जण शहनाजची बाजू घेताना दिसत आहेत. यातच प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) यानेदेखील उडी घेतली असून, त्याने शहनाजला समर्थन दिलं आहे.

  काय आहे प्रकरण?

  टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक शहनाज गिलने (Shahnaz Gill viral video) काही दिवसांपूर्वी एका साखरपुड्यात हजेरी लावली होती. या ठिकाणी शहनाजने झिंगाट गाण्यावर डान्स केला होता. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हिडिओंवरुनच असीमने शहनाजवर टीका (Asim Riaz tweet) केली होती. “काही डान्सचे व्हिडिओ पाहिले. काही लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्यानंतर किती लवकर त्यातून बाहेर पडतात. क्या बात!” अशा आशयाचे ट्विट असीमने केले होते. या ट्विटमध्ये त्याने टाळ्या वाजवतानाचा इमोजी आणि ‘न्यू वर्ल्ड’ असा हॅशटॅगही वापरला होता.

  शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांची केमिस्ट्री सर्वांनाच ठाऊक आहे. ते दोघे घनिष्ठ मित्र होते. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे शहनाजला मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यातून आता ती बाहेर पडते आहे. अशात असीमने केलेल्या या टीकेमुळे शहनाजचे फॅन्स खूप नाराज झाले. असीमच्या विवादास्पद ट्विटनंतर शहनाजच्या फॅन्सकडून त्याचे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केले जात आहे. बॉलिवूड लाईफने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

  हे वाचा-घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदा समोर आले Samanthaआणि Naga

  करणवीरने घेतली शहनाजची बाजू

  दरम्यान, टीव्ही स्टार करणवीर बोहरानेही असीमवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. त्याने आपल्या एका जुन्या ट्विटला रिट्विट (Karanvir Bohra tweet) करत असीमवर निशाणा साधला. “काही लोक खरंच इतरांना हसताना पाहू शकत नाहीत. विशेषतः तेव्हा जेव्हा ते आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतील. याला ‘न्यू वर्ल्ड’ नाहीत म्हणत. याला दुःखांमधून, वेदनेमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणतात.” अशा शब्दांमध्ये करणवीरने असीमला सुनावले आहे.

  दरम्यान, या सगळ्या प्रकारावर अद्याप शहनाजने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, ट्रोल झाल्यानंतर असीमनेही आपले ट्विट डिलिट केले नाही. त्यामुळे हा वाद आता कोणत्या थराला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान असीम रियाझने आज आणखी एक ट्वीट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर त्याला ट्रोल केले जात आहे.

  लेटेस्ट ट्वीटमध्ये असीम काय म्हणाला आहे?

  त्याने केलेले आधीचे ट्वीट जम्मूमधील एका मित्रासाठी असल्याचं त्याने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. काही ग्रुपमधील मित्र या मित्राच्या जाण्यानंतर पार्टी करत होते, त्यांच्यासाठी ते ट्वीट केल्याचं असीम म्हणतो आहे. तो असंही म्हणतोय की त्याला एखाद्याला बोलायचे असेल तर ते स्पष्टपणे बोलण्याची त्याच्यात हिंमत आहे. या ट्वीटवरही असीम ट्रोल झाला आहे. अनेकांनी टीका केल्यानंतर त्याने हे स्पष्टीकरणाचे ट्वीट केल्याचं यावर बोललं जात आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bigg boss, Sidharth shukla