मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदा समोर आले Samantha Ruth Prabhu आणि Naga Chaitanya

घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदा समोर आले Samantha Ruth Prabhu आणि Naga Chaitanya

चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र, 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून या दोघांनी घटस्फोट (Divorce) का घेतला असावा, याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क लढवले जात आहेत.

चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र, 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून या दोघांनी घटस्फोट (Divorce) का घेतला असावा, याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क लढवले जात आहेत.

चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र, 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून या दोघांनी घटस्फोट (Divorce) का घेतला असावा, याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क लढवले जात आहेत.

पुढे वाचा ...

 नवी दिल्ली, 28 डिसेंबर: अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे टॉलीवूडमधील सर्वांत सुंदर जोडप्यांपैकी एक होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र, 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून या दोघांनी घटस्फोट (Divorce) का घेतला असावा, याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क लढवले जात आहेत. अनेकांनी या घटस्फोटासाठी समंथाला जबाबदार ठरवत तिच्यावर आरोप केले होते. समंथानं वेळोवेळी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करून टीकाकारांना उत्तरं दिली आहेत. मात्र, या सर्व गोंधळात अभिनेता नागा चैतन्यनं कायम शांत राहणं पसंत केलं आहे. त्यानं अद्याप आपल्या घटस्फोटाबाबत जाहीरपणे काहीही वक्तव्य केलेलं नाही. घटस्फोटाची घोषणा झाल्यापासून समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य वेगळे राहत आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच दोघंही एकाच ठिकाणी दिसले. रिपोर्टनुसार, दोघेही हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये (Rama Naidu Studios) एकत्र दिसले. त्यामुळं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि समंथा आपापल्या चित्रपटांच्या शूटिंग निमित्त एका छताखाली आले होते. काही दिवसांपूर्वी दोघेही हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये आले होते. नागा चैतन्यनं 'बंगाराजू' (Bangarraju) चित्रपटाचं शूटिंग केलं तर त्याच स्टुडिओमध्ये समंथानं आपल्या 'यशोदा' (Yashoda) चित्रपटाचं शूटिंग केलं. दोघेही बराच काळ एकाच ठिकाणी उपस्थित असूनही त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. शूटिंगनंतर समंथा आणि नागा चैतन्य आपापल्या कारमध्ये बसून घरी निघून गेले.

आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर 2017 मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं होतं. चार वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. समंथा आणि नागानं आपापल्या सोशल मीडिया (Social Media Post) अकाउंटवर पोस्ट टाकून घटस्फोटाची माहिती दिली होती. 'आम्ही खूप विचार करून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. जवळपास दशकभरापासून आमची मैत्री आहे. तिच आमच्या नात्याचा आधार होती. पुढेदेखील आमची मैत्री कायम राहील असा विश्वास आहे. आमचे चाहते, शुभचिंतक आणि माध्यमांना विनंती आहे की, कठीण काळात त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आयुष्यात पुढे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी आम्हाला आवश्यक असलेली मोकळीक द्यावी. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद,' अशी पोस्ट दोघांनी केली होती.

घटस्फोटाच्या घोषणेनंतर समंथानं सोशल मीडियाचा आधार घेऊन अनेकदा आपलं मन मोकळं केलं आहे. मात्र, नागा चैतन्य एकदाही आपल्या घटस्फोटाबाबत बोललेला नाही. घटस्फोट झाल्यानंतरही मैत्रीचं नातं कायम राहील, असं दोघेही म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात एकाच ठिकाणी उपस्थित असून त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं आहे.

First published:
top videos

    Tags: Tollywood