मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

NCB च्या रेडदरम्यान फिल्मी स्टाइल फरार अभिनेता अखेर अटकेत; Bigg Boss स्पर्धकाच्या चौकशीत आलं होत नाव

NCB च्या रेडदरम्यान फिल्मी स्टाइल फरार अभिनेता अखेर अटकेत; Bigg Boss स्पर्धकाच्या चौकशीत आलं होत नाव

चित्रपट कलाकार आणि Bigg boss चा स्पर्धक असलेला एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर गौरव याला अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूडमधील ड्रग्स (Bollywood Drugs Case) प्रकरणांबाबत NCB कडून कारवाई सुरूच आहे. आता पुन्हा एकदा NCB ने टीव्ही कलाकारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. आता त्यांनी TV कलाकार गौरव दीक्षित याला अटक केली आहे. गौरव याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरात NCB ने छापेमारी केली होती. या छापेमारीत MD ड्रग्स, चरस आणि दूसरे ड्रग्स जप्त केले होते. चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर गौरव याला अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा-Aparshakti Khurana कंडोम खरेदीसाठी दुकानात कसा जायचा?, स्वतः केला खुलासा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठी नावं समोर आली आहेत. त्यामुळे एनसीबीकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात यापूर्वी बिग बॉगचा स्पर्धक असलेला एजाज खान याच्या चौकशीदरम्यान गौरव दीक्षित याचं नाव समोर आलं होतं. एप्रिल महिन्यात गौरव दीक्षित याच्या घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधं सापडली होती. यापूर्वीच एप्रिल महिन्यात मुंबई लोखंडवालामधील अभिनेत्याच्या फ्लॅटवर छापेमारी करण्यात आली होती. मात्र यावेळी अभिनेता घरात उपस्थित नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार तो एका परदेशी नागरिकत्व असलेल्या महिलेसोबत तेथे राहतो. छापेमारीच्या काही वेळापूर्वीत तो घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं जातं होतं. काहींच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, NCBची टीम त्याच्या फ्लॅटमध्ये छापेमारी करीत असताना इमारतीच्या खालूनच गौरव दीक्षित फरार झाला होता.
First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Drugs

पुढील बातम्या