Home /News /entertainment /

कंडोम खरेदी करण्यासाठी दुकानात कोणत्या अवस्थेत जायचा Aparshakti Khurana, स्वतः केला खुलासा

कंडोम खरेदी करण्यासाठी दुकानात कोणत्या अवस्थेत जायचा Aparshakti Khurana, स्वतः केला खुलासा

अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करत असून, त्याचा एक आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट येत्या तीन सप्टेंबर रोजीओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: वेगळ्या विषयांवरील चित्रपट स्वीकारण्यासाठी आणि कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या आयुष्मान खुरानाचा (Ayushman Khurana) भाऊ अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) यानं देखील ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं बद्रीनाथ की दुल्हनिया, लुकाछुपी, जबरीया जोडी, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांमध्ये सहायक भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करत असून, त्याचा एक आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट येत्या तीन सप्टेंबर रोजी झी फाईव्ह (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारतीय समाजात ज्या विषयांबद्दल खुलेपणानं बोललं जात नाही अशा विषयांवर हसतखेळत संदेश देणारे चित्रपट अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. याच जातकुळीतील ‘हेल्मेट’ (Helmet) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजही आपल्या देशात कंडोम (Condom) खरेदी करताना पुरुषांना प्रचंड संकोच वाटतो. त्यासाठी कोणकोणत्या युक्त्या वापरल्या जातात यावर आधारित हा चित्रपट आहे. या थ्रिलर कॉमेडी चित्रपटात अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहाल आणि अमेझॉन प्राईमवरील ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमध्ये ‘हथौडा त्यागी’च्या भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या निमित्ताने ‘बॉलिवूड लाईफ’शी बोलताना अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी कंडोम खरेदीबाबतचे वैयक्तिक अनुभव सांगितले.
अपारशक्ती खुराना यानं सांगितले की, चंडीगडमध्ये असताना तो कंडोम खरेदी करायला जात असे, तेव्हा एखाद्या डिलिव्हरी बॉयप्रमाणे हेल्मेट घालून दुकानात शिरत असे आणि कंडोम खरेदी करून बाईकवरून निघून जात असे. आजही अनेक लोक याचप्रकारे कंडोम खरेदी करतात. खासदार Nusrat Jahan यांनी दिली Good News! अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन अभिषेक बॅनर्जी आपला अनुभव सांगताना म्हणाला की, तो कॉलेजमध्ये असताना कंडोम खरेदी करत असे तेव्हा त्यानं कधीही असं हेल्मेट घातलं नाही; पण दुकानात गेल्यावर तो आसपास कोणी महिला उभी नाही ना, हे आवर्जून बघत असे. एखादी महिला आसपास असेल तर त्याला कंडोम घेताना जास्त लाज वाटत असे. पुढं त्यानं सांगितलं की, कंडोम खरेदी करण्यापेक्षा ते सांभाळून ठेवणे जास्त त्रासदायक होते कारण त्याची आई नेहमी त्याच्या बॅग तपासायची. यासाठी तो कंडोम आपल्या उशीखाली ठेवायचा, एकदा मात्र त्याला त्याच्या उशीखालचा कंडोम गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याचे वडिल जिथं पैसे ठेवायचे तिथं त्याला ते कंडोम सापडलं होतं असंही अभिषेकनं सांगितलं.

'ती पाहा मद्रासी आली..' हेमा मालिनींची निर्मात्यांच्या पत्नी उडवायच्या खिल्ली; लुकवर करायच्या अशा कमेंट्स

 पुरुषांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हा विषय अतिशय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आला असून, सर्वांनी एकत्र बसून पहावा असा हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘बँड बज़ गया’ या गाण्याचा व्हिडिओही प्रदर्शित करण्यात आला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bollywood actor

पुढील बातम्या