मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'पदर, पदर... ' शिवलीला पाटीलचा जुना VIDEO व्हायरल; Bigg Boss'अंदाजाने उडवली जातेय खिल्ली

'पदर, पदर... ' शिवलीला पाटीलचा जुना VIDEO व्हायरल; Bigg Boss'अंदाजाने उडवली जातेय खिल्ली

'बिग बॉस मराठी'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तब्बल १५ स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला आहे.

'बिग बॉस मराठी'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तब्बल १५ स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला आहे.

'बिग बॉस मराठी'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तब्बल १५ स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर- 'बिग बॉस'(Bigg Boss) हा जितका लोकप्रिय शो आहे तितकाच तो वादग्रस्तसुद्धा आहे.हा शो नेहमीच आपल्या स्पर्धकांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतो. नुकताच 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. हा शो पहिल्याच आठवड्यापासून आपल्या स्पर्धकांमुळे सतत चर्चेत आहे. या पर्वात महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील(Shivlila Patil) यांनी सहभाग घेतला आहे. शोमध्ये सहभागी झाल्याने पहिल्या दिवशीच त्या ट्रोल झाल्या होत्या. मात्र आता त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Vedio) होत आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागल्या आहेत.

" isDesktop="true" id="610499" >

महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. आपल्या राज्यात भजन, कीर्तन अशा पारंपरिक कलेचं वास्तव्य आहे. अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनाने भक्तांना अध्यात्माकडे घेऊन जाण्याचं काम करतात. त्यांना विठुरायाच्या भक्तीत रमवतात. अशाच एक कीर्तनकार म्हणजे शिवलीला पाटील होय. शिवलीला यांचा जन्म सोलापूरमधील बार्शी येथे झाला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार त्या नवसाने झालेल्या कन्या आहेत. तसेच त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तनाची गोडी लागली होती. इतक्या लहान वयात त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हेही एक कीर्तनकार होते. त्यामुळे हा वारसा त्यांना जन्मजात मिळाला आहे. त्यांनी अनेक कीर्तने करून आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात 'हल्ला बोल'; धमाकेदार टास्कने रंगणार दुसरा..)

मात्र त्यांच्या 'बिग बॉस'च्या एन्ट्रीने हा चाहतावर्ग नाराज असल्याचं दिसत आहे. अनेक चाहत्यांनाही त्यांना 'ताई चुकीचा निर्णय घेतल्याचं' म्हटलं आहे. तर अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर शिवलीला यांचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्याच्या एका जुन्या किर्तनाचा आहे. यामध्ये त्या महिलांच्या मॉडर्न अंदाजावर टीका करताना दिसत आहेत. आपली संस्कृती विसरून डोक्यावरील पदर पाडून केस सोडून समाजात सर्वत्र वावरणाऱ्या महिलांवर त्यांनी कडक शब्दात टीका केलेला हा व्हिडीओ आहे. तर दुसरीकडे शिवलीला बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत केस सोडून त्यांच्यासारखा डान्स करताना दिसत आहेत. लोकांना हा विरोधाभास पटत नाहीय. त्यामुळे शिवलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: 'मला तुझी भीती वाटते...' कोणत्या स्पर्धकाला घाबरला जय दुधाणे)

'बिग बॉस मराठी'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तब्बल १५ स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला आहे. शोमध्ये स्पर्धक विविध टास्क करताना दिसून येत आहेत. प्रत्येक स्पर्धक शोमध्ये टिकून राहण्यासाठी आपली धडपड करत आहेत. दरम्यान त्यांच्यामध्ये अनेक राडे पाहायला मिळत आहेत. अशातच शोचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. आता कोण घरात टिकून राहणार आणि कोण पहिल्याच नॉमिनेशनमध्ये बाहेर होणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment